नवी दिल्ली: इंडिगो विमानासंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. गुवाहाटीहून चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे गुरुवारी संध्याकाळी आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानाच्या आपत्कालीन लँडिंगपूर्वी वैमानिकांनी 'मेडे कॉल' केला होता. या विमानात 168 प्रवासी होते. अहमदाबादमध्ये टेकऑफ झाल्यानंतर लंडनला जाणाऱ्या एअर इंडिया ड्रीमलाइनर विमानाला अपघात झाल्यानंतर एका आठवड्यानंतर ही घटना घडली आहे. अहमदाबाद विमान अपघाताच्या काही सेकंद आधी वैमानिकाने मेडे कॉल केला होता.
प्राप्त माहितीनुसार, गुवाहाटीहून चेन्नईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमान क्रमांक 6E 6764 ला इंधनाच्या कमतरतेमुळे पायलटने 'मेडे' कॉल केला होता. त्यानंतर लगेचच विमान बेंगळुरूला वळवण्यात आले. विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आले. या विमानात इंधनाचा तुटवडा होता, त्यानंतर ते बेंगळुरूमध्ये सुरक्षितपणे उतरवण्यात आले. या विमानात 168 प्रवासी होते.
हेही वाचा - अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाच्या विमान बुकिंगमध्ये मोठी घट; 15 टक्क्यांनी स्वस्त झाली तिकिटे
मदुराईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात तांत्रिक बिघाड -
दरम्यान, शुक्रवारी मदुराईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात हवेत तांत्रिक समस्या आली. त्यानंतर या विमानाच्या पायलटने चेन्नईत परतण्याची परवानगी मागितली होती. या विमानात सुमारे 68 प्रवासी होते. यानंतर सर्व प्रवाशांना योग्य सुरक्षा उपायांसह विमानातून खाली उतरवण्यात आले.
हेही वाचा - 11अ नव्हे तर विमानाचा हा भाग आहे सर्वात सुरक्षित! विमान अपघातानंतरही वाचू शकतो जीव
अहमदाबाद विमान अपघातापूर्वीही करण्यात आला होता 'मेडे कॉल' -
एअर इंडियाचे बोईंग 787-8 ड्रीमलायनर विमान 12 जून रोजी अहमदाबादहून लंडनला जात होते. अहमदाबादहून उड्डाण घेतल्यानंतर लगेच पायलटने 'मेडे कॉल' केला होता. निवासी इमारतींना धडकल्यानंतर या विमानाचा मोठा स्फोट झाला होता. ज्यात केवळ एक प्रवाशी बचावला होता.