Bus Hit by Landslide In Bilaspur: हिमाचल प्रदेशातील बिलासपूर जिल्ह्यातील झंडुता परिसरात मंगळवारी सकाळी झालेल्या भीषण भूस्खलनात एका प्रवासी बसवर मोठा ढिगारा कोसळला. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला असून, अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी बसमध्ये सुमारे 30 प्रवासी होते. भूस्खलनानंतर बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आले. एनडीआरएफ आणि स्थानिक पोलिस दल घटनास्थळी दाखल झाले आहेत.
हेही वाचा - Railway Ministry On News Project : चार राज्य, 18 जिल्ह्यांना जोडणारा रेल्वेचा बहुउद्देशीय प्रकल्प; मोदी सरकारकडून 24,634 कोटींची मंजुरी, महाराष्ट्रातील 'हे' मार्ग जोडणार
ढिगाऱ्याखाली अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती गंभीर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ही घटना पुन्हा एकदा हिमाचल प्रदेशातील पर्वतीय भागातील अस्थिर हवामान आणि भूस्खलनाच्या धोका याकडे लक्ष वेधते. मुसळधार पावसामुळे या भागात रस्ते धोकादायक झाले असून वाहतूक मार्ग वारंवार खंडित होत आहेत.
हेही वाचा - Bhushan Gavai : 'त्या' घटनेमुळे गवई कुटुंबीय व्यथित; आई आणि बहीण प्रतिक्रिया देताना म्हणाल्या, 'कायदा हातात घेऊन देशात...'
दरम्यान, हिमाचल प्रदेशात आणखी एक अपघात घडला आहे. कांगडा जिल्ह्यातील पालमपूर परिसरात सीएसआयआर कॅम्पसजवळ पठाणकोट-मंडी महामार्गावर मनालीहून पठाणकोटकडे जाणारी एक खाजगी बस रस्त्यावरून घसरली. या अपघातात सहा प्रवासी जखमी झाले. त्यांना तातडीने पालमपूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले आहे. दोन्ही अपघातांची चौकशी सुरू असून प्रशासनाने नागरिकांना पर्वतीय भागात प्रवास करताना सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.