Gautam Adani : अमेरिकन कोर्टाचा मोठा निर्णय; गौतम अदानींवरील सर्व फौजदारी आरोप फेटाळले

अमेरिकन न्यायालयाने अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी आणि त्यांचे पुतणे सागर अदानी यांच्याविरोधातील दोन वर्षांपासून प्रलंबित असलेला फौजदारी खटला पूर्णपणे बंद केला आहे.

Gautam Adani : अमेरिकन कोर्टाचा मोठा निर्णय; गौतम अदानींवरील सर्व फौजदारी आरोप फेटाळले

Gautam Adani : उद्योगपती गौतम अदानी आणि त्यांच्या कुटुंबासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. अमेरिकन न्यायालयाने अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी आणि त्यांचे पुतणे सागर अदानी यांच्याविरोधातील दोन वर्षांपासून प्रलंबित असलेला फौजदारी खटला पूर्णपणे बंद केला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे अदानी समूहावर टांगती असणारी कायदेशीर टांगती तलवार अखेर दूर झाली आहे.

कायदेशीर बाबी आणि न्यायालयाचा निर्णय

अमेरिकेच्या न्याय विभागाने (DoJ) केलेल्या विनंतीचा गांभीर्याने विचार करत अमेरिकन जिल्हा न्यायालयाने हा मोठा निर्णय दिला. गौतम अदानी, सागर अदानी आणि अदानी ग्रीनचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विनीत जैन यांच्यावर दाखल केलेले सिक्युरिटीज फ्रॉड तसेच वायर फ्रॉडशी संबंधित सर्व आरोप न्यायालयाने 'विथ प्रिज्युडिस' या तत्त्वाखाली फेटाळून लावले आहेत. कायदेशीर भाषेत याचा अर्थ असा होतो की, याच समान आरोपां आधारे भविष्यात या तिघांवर पुन्हा कधीही कोणतीही फौजदारी कारवाई किंवा खटला दाखल केला जाऊ शकत नाही.

लाचखोरीच्या आरोपांची पार्श्वभूमी

या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात नोव्हेंबर 2024 मध्ये झाली होती. त्यावेळी अमेरिकन सरकारी वकिलांनी असा खळबळजनक दावा केला होता की, भारतात सौरऊर्जेची मोठी कंत्राटे मिळवण्यासाठी अदानी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुमारे 250 दशलक्ष डॉलर्सची लाच देण्याचा कट रचला होता. तथापि, अदानी समूहाने सुरुवातीपासूनच हे सर्व दावे पूर्णपणे निराधार, चुकीचे आणि दिशाभूल करणारे असल्याचे ठामपणे सांगितले होते. खटला फेटाळण्यापूर्वी न्यायाधीश निकोलस गाराफिस यांनी सरकारकडे यामागच्या कारणांचा स्पष्टीकरण मागितले होते; त्यावर पुराव्यांची कमतरता आणि कायदेशीर अडचणी लक्षात घेता हा खटला पुढे चालवणे न्यायाच्या दृष्टीने योग्य ठरणार नाही, असे न्याय विभागाने स्पष्ट केले.

'क्लीन चिट' नसली तरी फौजदारी कारवाईतून मुक्ती

तांत्रिकदृष्ट्या न्यायालयाने या आरोपांवर प्रत्यक्ष सुनावणी करून गौतम अदानी यांना 'क्लीन चिट' दिलेली नाही किंवा निर्दोष घोषित केलेले नाही, कारण हा खटला कधी प्रत्यक्ष साक्षी-पुराव्यांच्या टप्प्यापर्यंत पोहोचलाच नाही. मात्र, फौजदारी खटला कायमस्वरूपी बंद झाल्याने अदानी समूहाला मोठा नैतिक आणि कायदेशीर विजय मिळाला आहे. दुसरीकडे, एसईसी (SEC) सोबतच्या स्वतंत्र दिवाणी प्रकरणात अदानी यांनी कोणतेही आरोप मान्य न करता 6 दशलक्ष डॉलर्सचा दंड भरून तो विषय वेगळ्या पातळीवर हाताळला आहे.

हेही वाचा – Dhule Crime: साक्रीत पत्नीची दगडाने ठेचून हत्या; घटनेनंतर अवघ्या दोन तासांत संशयित पती पोलिसांच्या ताब्यात

सत्याचा विजय आणि अदानींची प्रतिक्रिया

न्यायालयाच्या या अंतिम निकालानंतर गौतम अदानी यांनी अत्यंत नम्रतेने आणि संयमाने आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. अमेरिकन न्यायव्यवस्थेवर आणि कायद्याच्या राज्यावर आपला नेहमीच विश्वास राहिला असून, कठीण प्रसंगातही सत्याचाच विजय होतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number