Kudankulam Nuclear Power Plant: भारताच्या अणुऊर्जा प्रकल्पावर मोठा सायबर हल्ला? कुडनकुलमच्या 19000 अतिसंवेदनशील फाईल्स डार्क वेबवर लीक

देशातील सर्वात मोठ्या कुडनकुलम अणुप्रकल्पाशी संबंधित हजारो अत्यंत गोपनीय दस्तऐवज डार्क वेबवर लीक झाल्याचा दावा सायबर गुन्हेगारांनी केला आहे.

Kudankulam Nuclear Power Plant: भारताच्या अणुऊर्जा प्रकल्पावर मोठा सायबर हल्ला? कुडनकुलमच्या 19000 अतिसंवेदनशील फाईल्स डार्क वेबवर लीक

Kudankulam Nuclear Power Plant: भारताच्या सामरिक सुरक्षेला आव्हान देणारी एक अत्यंत चिंताजनक बातमी समोर आली आहे. देशातील सर्वात मोठ्या कुडनकुलम अणुप्रकल्पाशी संबंधित हजारो अत्यंत गोपनीय दस्तऐवज डार्क वेबवर लीक झाल्याचा दावा सायबर गुन्हेगारांनी केला आहे. 'वर्ल्ड लीक्स' या कुप्रसिद्ध रॅन्समवेअर टोळीने या सायबर चोरीची जबाबदारी घेतली असून, यामध्ये प्रकल्पाची तांत्रिक संरचना (ब्लूप्रिंट्स), पुरवठा साखळीची माहिती, अंतर्गत बैठकांचे इतिवृत्त आणि विम्यासंदर्भातील संवेदनशील कागदपत्रे सार्वजनिक करण्यात आल्याचे म्हटले आहे. या प्रकारामुळे देशाच्या ऊर्जा आणि राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

अनिल अंबानींच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या सर्व्हरमधून डेटा चोरी

सायबर हल्लेखोरांच्या दाव्यानुसार, हा डेटा थेट अणुप्रकल्पातून नव्हे, तर तेथील कंत्राटदार असलेल्या अनिल अंबानी यांच्या 'रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर'च्या यंत्रणेतून चोरण्यात आला आहे. रिलायन्सने या घटनेला दुजोरा दिला असून, 'योट्टा' या थर्ड-पार्टी डेटा सेंटरच्या सर्व्हरवर हा सायबर हल्ला झाल्याची कबुली दिली आहे. या सुरक्षा भेदाची माहिती कंपनीने केंद्र सरकारला आधीच दिली होती, मात्र लीक झालेल्या डेटाचे नेमके स्वरूप आणि त्याचे गांभीर्य याबाबत स्पष्टता नव्हती, असे आता उघड झाले आहे.

लाखो फाईल्स लीक; Unit-3 आणि Unit-4 ची गुप्त माहिती धोक्यात

डार्क वेबवर एकूण 858000 फाईल्स अपलोड करण्यात आल्या असून, त्यापैकी 19000 फाईल्स अत्यंत संवेदनशील आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने घातक श्रेणीतील आहेत. रिलायन्स कंपनी सध्या कुडनकुलम येथील युनिट-3 आणि युनिट-4 च्या उभारणीचे काम पाहत आहे. पुढील वर्षी कार्यान्वित होणाऱ्या या दोन्ही प्रकल्पांमधून 2000 मेगावॅट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट आहे. लीक झालेल्या विम्याच्या कागदपत्रांमध्ये एक खळबळजनक उल्लेख असून, न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन आणि रिलायन्स यांच्यात झालेल्या करारानुसार, या दोन्ही युनिट्सवर दहशतवादी हल्ला झाल्यास 11.2 कोटी डॉलरपर्यंतच्या विम्याची तरतूद करण्यात आली आहे.

राष्ट्रीय सायबर यंत्रणा सतर्क; तपासाला वेग

या गंभीर सायबर हल्ल्याची दखल घेत अणुऊर्जा विभागाने तत्परतेने हालचाली सुरू केल्या असून, ते रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या संपर्कात आहेत. भारताची सर्वोच्च सायबर सुरक्षा संस्था या डेटा लीक प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी तातडीने तपास करत आहे. सार्वजनिक झालेल्या कागदपत्रांची अधिकृत पडताळणी अद्याप झालेली नसली, तरी सुरक्षेचा प्रश्न पाहता अत्यंत गुप्ततेने चौकशी सुरू आहे. केंद्र सरकारने अद्याप या संवेदनशील विषयावर कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही.

हेही वाचा – Pune Crime: पुणे हादरले! नववीतील विद्यार्थिनीवर रोबोटिक्स शिक्षकाकडून लैंगिक अत्याचार; नराधम आरिफ सय्यदला अटक

टाटा समूह आणि नाईकीनंतर आता भारतीय अणुप्रकल्प टार्गेटवर

डेटाची चोरी करणारी 'वर्ल्ड लीक्स' ही टोळी जागतिक स्तरावर मोठ्या कंपन्यांना लक्ष्य करण्यासाठी ओळखली जाते. यापूर्वी त्यांनी नाईकी आणि भारतातील अग्रगण्य टाटा समूहाच्या यंत्रणेत घुसखोरी केली होती. जून महिन्यात त्यांनी टाटा समूहाचा डेटा ओलीस ठेवून 15 लाख डॉलरच्या खंडणीची मागणी केली होती, जी न मिळाल्याने त्यांनी तो डेटा सार्वजनिक केला होता. आता थेट भारताच्या संवेदनशील अणुऊर्जा प्रकल्पाला लक्ष्य केल्यामुळे सायबर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number