Sugar Price Drop: ग्राहकांना मोठा दिलासा! साखरेचे भाव तब्बल 20 टक्क्यांनी घसरले; कारवाईनंतर साठेबाजी करणाऱ्यांचे धाबे दणाणले

सरकारने साखरेचा मासिक विक्री कोटा पद्धत बंद करून दर 15 दिवसांनी कोटा निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या धोरणाची अंमलबजावणी सप्टेंबर महिन्यापासून सुरू होत आहे.<br/>

Sugar Price Drop: ग्राहकांना मोठा दिलासा! साखरेचे भाव तब्बल 20 टक्क्यांनी घसरले; कारवाईनंतर साठेबाजी करणाऱ्यांचे धाबे दणाणले

Sugar Price Drop: देशांतर्गत बाजारात साखरेचा तुटवडा दाखवून दरवाढ करणाऱ्या सट्टेबाजांवर आणि साठेबाजांवर केंद्र सरकारने कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. प्रशासनाच्या या आक्रमक पावलांमुळे गेल्या काही दिवसांत साखरेच्या घाऊक व किरकोळ किमतींमध्ये तब्बल 20 टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. बाजारात साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध असतानाही केवळ नफेखोरीसाठी दर वाढवले जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर, सरकारने साखरेचा मासिक विक्री कोटा पद्धत बंद करून दर 15 दिवसांनी कोटा निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या धोरणाची अंमलबजावणी सप्टेंबर महिन्यापासून सुरू होत आहे.

नवीन विक्री नियमांमुळे साठा रोखणे अशक्य 
बाजारात साखरेचा सुरळीत पुरवठा ठेवण्यासाठी सरकारने साखर कारखानदारांवर नवे कडक नियम लादले आहेत. आता कारखान्यांना आपल्या 15 दिवसांच्या कोट्यापैकी किमान 40 टक्के साखर पहिल्या आठवड्यातच बाजारात आणावी लागणार आहे. उर्वरित साखरेची विक्री दुसऱ्या आठवड्यात करणे अनिवार्य राहील. याशिवाय, व्यापाऱ्यांसोबत विक्रीचा करार झाल्यापासून अवघ्या 7 दिवसांच्या आत प्रत्यक्ष साखरेची उचल करून ती कारखान्यातून बाहेर पाठवणे सक्तीचे करण्यात आले आहे. या निर्णयामुळे कारखानदार आणि मोठे व्यापारी अधिक काळ साठा दाबून ठेवू शकणार नाहीत.

नव्या हंगामात साखरेचे उत्पादन वाढणार; पुरवठा अधिक मजबूत होणार
येत्या 15 ऑक्टोबरपासून साखरेचा नवीन गाळप हंगाम सुरू होत आहे. या आगामी हंगामात साखरेचे मुबलक उत्पादन होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नव्या वर्षात ऑक्टोबर महिन्यात 10 लाख टन, तर नोव्हेंबरमध्ये तब्बल 45 लाख टन साखरेची निर्मिती अपेक्षित आहे. याव्यतिरिक्त, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सुरू असलेल्या कारखान्यांमुळे चालू सप्टेंबर महिन्यातच अतिरिक्त 2 लाख टन साखर बाजारात दाखल होणार आहे.

हेही वाचा – NTAमध्ये मोठी खळबळ! दोन संचालकांसह एका सहसंचालकांची नियुक्ती; NEET वादानंतर केंद्राचा मोठा निर्णय

अॅडव्हान्स ऑथोरायझेशन योजनेमुळे बाजारात अतिरिक्त साठा दाखल
केंद्र सरकारने 'अॅडव्हान्स ऑथोरायझेशन स्कीम' (AAS) अंतर्गत आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून ती स्थानिक बाजारात विक्रीस उपलब्ध करून देण्याची सवलत प्रक्रियादारांना दिली आहे. यामुळे बाजारात अचानक साखरेची आवक वाढली आहे. सरकारच्या या चौफेर रणनीतीमुळे बाजारात हस्तक्षेप करणे सोपे झाले असून, आगामी सण-उत्सवांच्या काळात साखरेचे भाव नियंत्रणात राहून सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number