LPG e-KYC Deadline Extended: सामान्य कुटुंबांतील घरगुती स्वयंपाकाच्या गॅस (LPG) ग्राहकांसाठी प्रशासनाकडून एक अत्यंत दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. एलपीजी कनेक्शनच्या ई-केवायसी (e-KYC) पडताळणीसाठी ठरवून दिलेली अंतिम तारीख आता वाढवून 31 ऑगस्ट 2026 करण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत सुरुवातीला 16 ऑगस्ट आणि नंतर 23 ऑगस्टपर्यंत निश्चित करण्यात आली होती. मात्र, तांत्रिक अडचणी आणि केंद्रांवर लागणाऱ्या मोठ्या रांगांमुळे बहुतांश ग्राहकांची पडताळणी प्रक्रिया अपूर्ण राहिली होती. ही बाब विचारात घेऊन भारत गॅस (Bharat Gas), इंडेन (Indane) आणि एचपी गॅस (HP Gas) या सर्व प्रमुख कंपन्यांच्या ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी सरकारने ही नवी तारीख निश्चित केली आहे.
पडताळणी न केल्यास होणारे संभाव्य नुकसान
नव्याने दिलेल्या मुदतीत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधित ग्राहकांचे गॅस कनेक्शन तत्काळ रद्द केले जाणार नाही; परंतु त्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. मुदतीत पडताळणी न झाल्यास मिळणारे शासकीय अनुदान (Subsidy) तात्पुरते रोखले जाऊ शकते.
एवढेच नव्हे तर सिलिंडर नोंदणी करताना किंवा घरपोच डिलिव्हरी मिळवताना विविध अडचणींचा सामना करावा लागू शकतो. ई-केवायसी न झालेल्या ग्राहकांना व्यावसायिक दर लागू होण्याचा अथवा नवीन सिलिंडरच्या पुरवठ्यात विलंब होण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण टाळण्यासाठी वेळेत प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
हेही वाचा – LPG Rules: स्वयंपाकाच्या गॅसबाबत केंद्र सरकारचे नवे निर्देश; 'या' भागातील LPG कनेक्शन होणार रद्द
e-KYC प्रक्रियेचे मुख्य उद्दिष्ट आणि बेकायदेशीर वापरावर आझाड
शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या या मोहिमेचा मुख्य हेतू गॅस वितरणातील गैरप्रकारांना आळा घालणे हा आहे. घरगुती वापरासाठी सवलतीच्या दरात मिळणाऱ्या सिलिंडरचा अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे हॉटेल, ढाबे किंवा व्यावसायिक कामांसाठी वापर केला जातो. व्यावसायिक आणि घरगुती गॅसच्या दरांमध्ये मोठी तफावत असल्याने हा काळाबाजार रोखणे अत्यंत आवश्यक बनले आहे. याशिवाय बनावट किंवा दुबार (Duplicate) गॅस कनेक्शन शोधून केवळ पात्र आणि खऱ्या लाभार्थ्यांपर्यंतच सरकारी अनुदानाचा थेट फायदा पोहोचवणे, हा या ई-केवायसी पडताळणीमागील मुख्य उद्देश आहे.