Mamata Banerjee Car Stone Pelting : ममता बॅनर्जींच्या गाडीवर दगडफेक; म्हणाल्या, ‘खिडक्या उघड्या असत्या तर माझं डोकं…’

तृणमूल काँग्रेसच्या (TMC) एका कार्यकर्त्याच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेल्या असताना पोलिसांच्या उपस्थितीतच असा हल्ला झाल्याचा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

Mamata Banerjee Car Stone Pelting : ममता बॅनर्जींच्या गाडीवर दगडफेक; म्हणाल्या, ‘खिडक्या उघड्या असत्या तर माझं डोकं…’

Mamata Banerjee Car Stone Pelting :  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या गाडीवर बॅरकपूर येथे दगडफेक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तृणमूल काँग्रेसच्या (TMC) एका कार्यकर्त्याच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेल्या असताना पोलिसांच्या उपस्थितीतच असा हल्ला झाल्याचा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे. या दुर्घटनेवर संताप व्यक्त करत त्या म्हणाल्या की, गाडीच्या खिडक्या उघड्या असत्या तर त्यांचे डोके फुटले असते आणि मोठा अनर्थ घडला असता. या घटनेदरम्यान जमावाकडून त्यांच्याविरोधात “चोर, चोर” अशा घोषणाही देण्यात आल्या. तसेच, राज्यातील पोलीस भाजपच्या कार्यकर्त्यांना संरक्षण देत असल्याचा थेट आरोप त्यांनी यावेळी केला.

पोलिसांच्या समोरच दगडफेक झाल्याचा ममतांचा दावा

बॅरकपूर येथे पोहोचल्यानंतर आपल्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती देताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, उपद्रवी घटकांनी पोलिसांच्या देखरेखीतच त्यांच्या वाहनावर मोठे दगड भिरकावले. “हा हल्ला इतका भीषण होता की गाडीच्या काचा बंद असल्यामुळेच मोठा अपघात टळला. जर खिडक्या उघड्या असत्या तर आम्ही सर्व मारले गेलो असतो,” असा गंभीर आरोप त्यांनी केला. राजकीय आयुष्यात असा प्रकार कधीही पाहिला नसल्याचे सांगत त्यांनी प्रशासनाच्या आणि पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र तीव्र असंतोष व्यक्त केला.

भाजपकडून घटनेचा निषेध आणि आरोपांचे खंडन

दरम्यान, या घटनेवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष सामिक भट्टाचार्य यांनी प्रतिक्रिया देत हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. माजी महिला मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर चिखल, चपला किंवा दगड फेकण्याच्या कृत्याला भाजपचा कधीही पाठिंबा असणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. या घटनेत भाजपचा कोणताही कार्यकर्ता सामील नसून अशा प्रकारांमुळे राज्याची प्रतिमा मलीन होते, असे मत त्यांनी मांडले. तसेच, जर असा हल्ला खरोखरच घडला असेल, तर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेऊन तत्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

हेही वाचा – Devendra Fadnavis: डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांनी घेतली सतेज पाटलांची भेट; दोन्ही भावांना दिला धीर

‘ही भाजपची संस्कृती नाही’: अग्निमित्रा पॉल

राज्यमंत्री अग्निमित्रा पॉल यांनीही या प्रकरणावर पक्षाची भूमिका स्पष्ट केली. कोणत्याही व्यक्तीवर, विशेषतः एका ज्येष्ठ महिलेविरुद्ध शारीरिक हल्ला करणे, गैरवर्तन करणे किंवा शाई-बूट फेकणे हे भाजपच्या संस्कृतीत बसत नाही, असे त्या म्हणाल्या. ममता बॅनर्जी यांच्याशी राजकीय मतभेद किंवा त्यांच्या चुका असू शकतात; मात्र त्यांच्याविरोधात अशा हिंसक वर्तनाचे समर्थन पक्ष कधीही करणार नाही. भाजपचे नाव सांगून जर कोणी असे कृत्य करत असेल, तर ते पूर्णपणे चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number