Narendra Modi Video: ‘मार्क झुकरबर्ग यांनी पंतप्रधान मोदींची माफी मागावी, अन्यथा…’ व्हिडीओ हटवल्याने मेटाच्या CEO ला संसदीय समितीचा अल्टिमेटम

संसदीय समितीने मेटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मार्क झुकरबर्ग यांना 3 दिवसांची कडक समज दिली आहे.

Narendra Modi Video: ‘मार्क झुकरबर्ग यांनी पंतप्रधान मोदींची माफी मागावी, अन्यथा…’ व्हिडीओ हटवल्याने मेटाच्या CEO ला संसदीय समितीचा अल्टिमेटम

Narendra Modi Video: इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञानविषयक संसदीय समितीने मेटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मार्क झुकरबर्ग यांना 3 दिवसांची कडक समज दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 23 जुलै रोजीचा व्हिडिओ तात्पुरत्या स्वरूपात हटवल्याप्रकरणी त्यांनी बिनशर्त माफी मागावी, तसेच या चुकीला जबाबदार असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, असा स्पष्ट निर्देश समितीने दिला आहे.

‘सेफ हार्बर क्लॉज’ रद्द करून एफआयआर दाखल करण्याचा इशारा

भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने नमूद केले की, 1.4 अब्ज भारतीयांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या देशाच्या पंतप्रधानांचा व्हिडिओ प्लॅटफॉर्मवरून हटवणे हा थेट ‘लोकशाहीवरील हल्ला’ आहे. फेसबुकने दोषींवर कठोर कारवाई केली नाही आणि झुकरबर्ग यांनी माफी मागितली नाही, तर कंपन्यांना मिळणारे ‘सेफ हार्बर’ (कायदेशीर संरक्षण) रद्द केले जाईल. यामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या अधिकाऱ्यांवर थेट एफआयआर (FIR) दाखल करण्याचा मार्ग मोकळा होईल, असेही समितीने बजावले आहे.

आयटी कायद्याच्या कलम 79(3) अन्वये कारवाईचा धोका

समितीने स्पष्ट केले आहे की, 3 दिवसांच्या आत माफी न मागितल्यास आयटी कायद्याच्या कलम 79(3) नुसार मिळणारे कायदेशीर संरक्षण काढून घेतले जाईल आणि मेटा कंपनीला एका ‘इंटरमीडिएटरी’ ऐवजी ‘प्रकाशक’ (Publisher) मानून कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. याशिवाय, बाल लैंगिक शोषणाशी संबंधित मजकूर (CSAM) आणि महिलांविरोधी आक्षेपार्ह पोस्ट न हटवणाऱ्या प्लॅटफॉर्म्सवरही अशाच प्रकारची कठोर कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसेच फसव्या ॲप्सप्रकरणी गुगल इंडियाच्या प्रमुखांवर कारवाई करण्याचे संकेतही देण्यात आले आहेत.

नेमका कोणता व्हिडिओ हटवला होता?

पंतप्रधान मोदी यांनी नीट (NEET) पेपरफुटीप्रकरणी ‘जनरेशन झेड’ (Gen Z) साठी एक खास ‘सेल्फी व्हिडिओ’ तयार करून इन्स्टाग्राम व फेसबुकवर शेअर केला होता. त्या दरम्यान ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) नेतृत्वाखाली विद्यार्थी आंदोलने करत होते. मेटाने हा व्हिडिओ फेसबुकवरून काही काळासाठी हटवला होता. नंतर ही घटना तांत्रिक चुकीमुळे घडल्याचे सांगत मेटाने दिलगिरी व्यक्त केली होती; मात्र माहिती तंत्रज्ञान (IT) मंत्रालयाने हे स्पष्टीकरण अमान्य केले.

हेही वाचा – Shiv Sena Symbol Case : ठाकरे की शिंदे! शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाला मिळणार? सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी

मेटाने दिले ‘एआय टूल’चे स्पष्टीकरण

आयटी मंत्रालयाने चौकशीसाठी बोलावल्यानंतर मेटाने सांगितले की, ही चूक त्यांच्या ‘ऑटोमेटेड एआय (AI) कंटेंट मॉडरेशन टूल’मुळे झाली होती. यावर उपाय म्हणून आता विशेष देखरेख यंत्रणा उभारली जाईल, असे कंपनीने स्पष्ट केले. तसेच भविष्यात कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मंजुरीशिवाय व्हीआयपी (VIPs) किंवा सेलिब्रिटींच्या पोस्ट्स हटवल्या जाणार नाहीत, असे आश्वासनही मेटाने दिले आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number