Friday, April 25, 2025 08:33:24 PM

सौरभने पत्नी आणि मुलीसाठी ‘कोफ्ते’ आणले; पण मुस्कानला जराही किंमत नव्हती! बॉयफ्रेंडसोबत मिळून पतीचे केले 15 तुकडे

Meerut Saurabh Rajput Murder : सौरभने त्याच्या आईने दिलेला 'कोफ्ते' हा खाद्यपदार्थ आणला. मुस्कानने हीच संधी साधत तो पदार्थ गरम करण्याच्या बहाण्याने त्यात गुंगीचे औषध मिसळले आणि तो सौरभला खायला दिला.

सौरभने पत्नी आणि मुलीसाठी ‘कोफ्ते’ आणले पण मुस्कानला जराही किंमत नव्हती बॉयफ्रेंडसोबत मिळून पतीचे केले 15 तुकडे

Meerut Saurabh Rajput Murder Case: उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये माजी मर्चंट नेव्ही अधिकारी सौरभ राजपूतची हत्या करून त्याचे तुकडे करून सिमेंटने ड्रममध्ये सीलबंद केल्याच्या प्रकरणात भयानक माहिती समोर येत आहे. हा भयंकर गुन्हा त्याची पत्नी मुस्कान आणि तिचा बॉयफ्रेंड साहिल शुक्ला यांनी 4 मार्च रोजी केल्याची माहिती पोलिसांनी दिली. यानंतर तब्बल दोन आठवड्यांनी हा गुन्हा घडल्याचे समोर आले. एसपी (शहर) आयुष विक्रम सिंह यांनी दोन्ही आरोपींनी या हत्येचा गुन्हा कबूल केला आहे, असे सांगत त्याबद्दल अधिक माहिती उघड केली.

4 मार्चला काय घडलं?
सौरभने त्याच्या आईने दिलेला भोपळ्यापासून बनवलेला कोफ्ते हा खाद्यपदार्थ आणला. अधिकाऱ्याने सांगितले की, 29 वर्षीय सौरभ 3 मार्च रोजी मुस्कान आणि त्याच्या मुलीला भेटण्यासाठी त्याची आई रेणू यांनी बनवलेला पदार्थ भोपळ्याचे कोफ्ते घेऊन घरी परतला. पत्नी मुस्कानने हीच संधी साधत तो पदार्थ गरम करण्याच्या बहाण्याने त्यात गुंगीचे औषध मिसळले आणि सौरभला खायला दिला. यानंतर बेशुद्ध झालेल्या सौरभवर चाकूने हल्ला करत त्याच्या शरीराचे अनेक तुकडे करण्यात आले. 

पोलिसांनी सांगितले की, सौरभ राजपूतच्या शरीराचे अवशेष सिमेंटने भरलेल्या ड्रममधून सापडले आहेत आणि त्याची पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा - विमानातून सगळे उतरले, पण एक जण उतरलाच नाही; झोपलेल्या व्यक्तीचा सीटबेल्ट काढताच सर्वांना बसला धक्का

भयंकर हत्येचा कट
सौरभ सध्या लंडनमध्ये काम करत होता. तो पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी 24 फेब्रुवारीला भारतात आला होता. त्याला त्याच्या पासपोर्टचेही काम करायचे होते. नोव्हेंबर 2024 पासून पतीला मारण्याचा कट रचणारी मुस्कान (27) हिने संधी साधली आणि कोफ्ते पुन्हा गरम करून आणण्याच्या बहाण्याने त्यात गुंगीचे औषध मिसळले. सौरभ बेशुद्ध पडताच तिने तिचा प्रियकर साहिल शुक्ला (27) याला इंदिरा नगर येथील त्यांच्या भाड्याच्या घरात सौरभला मारण्यासाठी बोलावले. सौरभ हा त्यांच्या नात्यातील 'अडथळा' बनला होता. या दोघांनी बेशुद्ध झालेल्या सौरभवर चाकूने हल्ला केला आणि त्याचा मृत्यू होईपर्यंत त्याच्यावर वारंवार वार केले, असे अधिकाऱ्याने सांगितले. मुस्कानने सौरभ परत जाऊ नये, यासाठी त्याचा पासपोर्टही लपवून ठेवल्याची माहिती समोर आली आहे.

असा आहे घटनाक्रम
24 फेब्रुवारी : सौरभ राजपूत पत्नी मुस्कानचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तिला सरप्राईज देण्यासाठी लंडनहून आला. 25 फेब्रुवारीला मुस्कानचा वाढदिवस होता.
4 मार्च : मुस्कान आणि तिचा बॉयफ्रेंड साहिल शुक्ला यांनी सौरभला गुंगीचे औषध दिले. तो गाढ झोपेत गेल्यानंतर त्याच्यावर अनेक वार करून त्याची हत्या केली.
5 मार्च : सकाळी मुस्कान आणि साहिल यांनी 50 किलो सिमेंट विकत घेतले. त्यांनी एका 220 लिटरच्या ड्रममध्ये सौरभच्या शरीराचे तुकडे टाकून त्यात सिमेंट आणि पाण्याचे मिश्रण तयार करून ओतले. त्याच संध्याकाळी ते दोघे शिमला येथे फिरायला गेले.
17 मार्च : दोघे आरोपी घरी परतले.
18 मार्च : मुस्कानने घडलेले सर्व काही तिच्या आईला सांगितले. यानंतर तिच्या आईने तिला पोलीस ठाण्यात नेले.

गुगलवर औषधांची नावे शोधली
पोलिसांनी सांगितले की मुस्कान झोपेच्या गोळ्या आणि अंमली पदार्थ अशा प्रकारे खरेदी करण्याचा प्रयत्न करत होती की, त्यामुळे कोणताही संशय येऊ नये.

पतीला मारण्यासाठी इतकी तयारी केली
22 फेब्रुवारी रोजी मुस्कानने शारदा रोडवरील एका डॉक्टरकडे जाऊन तिला नैराश्याने ग्रासले असल्याचा दावा केला आणि झोपेच्या गोळ्या मागितल्या. नंतर, डॉक्टरांनी तिचा कट पूर्ण करण्यासाठी पुरेशा प्रमाणात झोपेच्या गोळ्या लिहून न दिल्याने ती औषधांची नावे शोधण्यासाठी गुगल सर्च करू लागली.

प्रिस्क्रिप्शनमध्ये आणखी नावे जोडल्यानंतर, तिने आणि साहिलने खारिया नगरमधील एका फार्मसीमधून झोपेच्या गोळ्या आणि गुंगीची औषधे खरेदी केली. साहिलचे काम सोपे करण्यासाठी, त्यांनी 800 रुपये किमतीचे दोन मांस कापणारे चाकू, 300 रुपये किमतीचा रेझर आणि पॉलिथिन पिशव्या देखील खरेदी केल्या, असे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा - बिहारमध्ये अ‍ॅमेझॉनच्या पाण्यात आढळणारे इतर माशांना खाणारे अमेरिकन भक्षक कॅटफिश सापडले; स्थानिक मच्छिमार चिंतेत


सम्बन्धित सामग्री