Sunday, February 16, 2025 11:30:53 AM

Maha Kumbh's third 'Amrit Snan'
कुंभमेळ्यात आज तिसरं अमृत स्नान , कोट्यवधी भाविक स्नान करणार!

प्रयागराज कुंभमेळ्यात वसंत पंचमीच्या मंगलदिनी (सोमवार) तिसरे अमृतस्नान होणार आहे. यावेळी तब्बल ५ कोटी भाविक संगमात स्नानासाठी येण्याची शक्यता असून, प्रशासनाने गर्दी व्यवस्थापनासाठी व्यापक तयारी केली..

कुंभमेळ्यात आज तिसरं अमृत स्नान  कोट्यवधी भाविक स्नान करणार

प्रयागराज कुंभमेळ्यात वसंत पंचमीच्या मंगलदिनी (सोमवार) तिसरे अमृतस्नान होणार आहे. यावेळी तब्बल ५ कोटी भाविक संगमात स्नानासाठी येण्याची शक्यता असून, प्रशासनाने गर्दी व्यवस्थापनासाठी व्यापक तयारी केली आहे.

गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहनांना प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. परिणामी, भाविकांना 8 ते 12 किमी अंतर पायी चालून संगमावर पोहोचावे लागत आहे.सर्व आखाड्यांनी अमृतस्नानाची तयारी पूर्ण केली आहे. आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत रवींद्रपुरी यांनी सांगितले की, साधू-संत पहाटे 4.30  वाजता स्नानासाठी संगमावर रवाना झालेहोते. रविवारी रात्री ८ वाजेपर्यंत 1.29 कोटी लोकांनी स्नान केले, तर आतापर्यंत 34.90 कोटी भाविकांनी कुंभमेळ्यात स्नानाचा लाभ घेतला आहे.


गर्दी नियंत्रणासाठी ‘ऑपरेशन इलेव्हन’

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानुसार ‘ऑपरेशन इलेव्हन’ अंतर्गत सुरक्षा व्यवस्था भक्कम करण्यात आली आहे.
    •    6 टप्प्यांत पोलिस तैनात
    •    11 संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था
    •    व्हीआयपी व वाहनांसाठी प्रवेशबंदी


1200 मेडिकल फोर्स सतर्क

वसंत पंचमीच्या अमृतस्नानादरम्यान कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी 1200 पेक्षा अधिक मेडिकल फोर्स तैनात करण्यात आली आहे.
    •    एसआरएन हॉस्पिटल – 500 कर्मचारी सतर्क
    •    टीबी सप्रू चिकित्सालय – विशेष तयारी


त्याचबरोबर संगमाच्या घाटांवरील गर्दी नियंत्रणासाठी अतिरिक्त पोलिस दल, बॅरिकेडिंग आणि विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.


सम्बन्धित सामग्री