T20 World Cup: . "स्टेडियममध्ये फक्त निळा समुद्र…" मिचेल सॅन्टनरने भारतीय चाहत्यांच्या प्रेमासमोर झुकवले मस्तक

पराभवानंतर न्यूझीलंडचे कर्णधार मिचेल सॅन्टनर यांनी संघाच्या प्रयत्नांचे कौतुक करत अंतिम फेरीपर्यंत पोहोचणे ही मोठी कामगिरी असल्याचे सांगितले.

T20 World Cup: . &quotस्टेडियममध्ये फक्त निळा समुद्र…&quot मिचेल सॅन्टनरने भारतीय चाहत्यांच्या प्रेमासमोर झुकवले मस्तक

अहमदाबाद: टी-20 विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला भारताकडून मोठा पराभव पत्करावा लागला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या निर्णायक लढतीत भारताने 96 धावांनी विजय मिळवत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या पराभवामुळे न्यूझीलंडच्या संघाचे पहिल्यांदाच टी-20 विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले.

भारताने प्रथम फलंदाजी करताना पाच बाद 255 धावांचा भक्कम डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संपूर्ण संघ 19 षटकांत 159 धावांवर गारद झाला.

पराभवानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सॅन्टनर याने संघाच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले. ते म्हणाले की, या स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत पोहोचणे ही आमची मोठी कामगिरी आहे. संपूर्ण स्पर्धेत संघाने अनेक आव्हानांचा सामना केला, मात्र प्रत्येक टप्प्यावर खेळाडूंनी धैर्याने त्यावर मात केली. अंतिम सामन्यात भारतासारख्या मजबूत संघाविरुद्ध खेळताना आम्हाला पराभव पत्करावा लागला, तरीही न्यूझीलंड संघाच्या प्रयत्नांचा अभिमान वाटतो, असे त्याने नमूद केले.

हेही वाचा: Arshdeep Singh-Daryl Mitchell Controversy : अर्शदीपची 'ती' कृती अन् मिशेलला राग अनावर! काही सेकंदांसाठी मैदानातील वातावरण तापलं; नेमकं काय घडलं?

भारतामध्ये खेळताना मिळणाऱ्या प्रेक्षकांच्या उत्साहाबद्दलही सॅन्टनरने भाष्य केले. त्याने सांगितले की, भारतात खेळताना नेहमीच प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो. अंतिम सामन्याच्या वेळी संपूर्ण स्टेडियम निळ्या रंगाने नटलेले दिसत होते. असं वाटत होतं समोर मोठा निळा समुद्र आहे. मी हे सगळं पाहून भारावून गेलो. 

भारत हा घरच्या मैदानावरील संघ असल्याने त्यांना मोठे पाठबळ मिळाले आणि अशा परिस्थितीत विजेतेपद मिळवणे निश्चितच मोठी कामगिरी आहे. सूर्यकुमार यादव आणि त्यांच्या संघाने केलेल्या कामगिरीचे त्याने कौतुकही केले.

स्पर्धेदरम्यान न्यूझीलंडच्या संघाने केलेल्या कामगिरीविषयी बोलताना सॅन्टनर म्हणाला की, विविध टप्प्यांवर वेगवेगळ्या खेळाडूंनी जबाबदारी सांभाळली. सुपर-8 आणि उपांत्य फेरीत संघाने प्रभावी खेळ करत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. अंतिम सामन्यात भारत अधिक चांगला खेळला, मात्र तरीही न्यूझीलंडच्या खेळाडूंनी संपूर्ण स्पर्धेत दाखवलेल्या जिद्दीचा अभिमान असल्याचे त्याने सांगितले.

हेही वाचा: Virat Kohli on T20 World Cup final : सामन्याला अनुपस्थित असणाऱ्या विराट कोहलीने भारतीय संघाचे केलं कौतुक, म्हणाला, '…आणि पुन्हा एकदा विश्वविजेते'

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number