मिथुन चक्रवर्ती यांना पश्चिम बंगालमध्ये मोठी जबाबदारी; राज्य सरकारच्या माहिती व सांस्कृतिक विभागात सल्लागारपदी निवड

पश्चिम बंगालमधील माहिती, कला, संस्कृती आणि मनोरंजन या क्षेत्रांचे धोरणात्मक निर्णय घेणाऱ्या या अत्यंत महत्त्वाच्या विभागाची धुरा सध्या शुभेंदु अधिकारी यांच्याकडे आहे. या विभागात सल्लागार म्हणून मिथुन चक्रवर्ती यांची नियुक्ती झाली आहे.

मिथुन चक्रवर्ती यांना पश्चिम बंगालमध्ये मोठी जबाबदारी; राज्य सरकारच्या माहिती व सांस्कृतिक विभागात सल्लागारपदी निवड
Mithun Chakraborty

Mithun Chakraborty West Bengal Advisor : प्रसिद्ध अभिनेते आणि भारतीय जनता पक्षाचे (BJP) ज्येष्ठ नेते मिथुन चक्रवर्ती यांच्याकडे पश्चिम बंगाल राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. राज्याच्या माहिती आणि सांस्कृतिक व्यवहार विभागाचे (Information and Cultural Affairs Department) सल्लागार म्हणून त्यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. पश्चिम बंगालचे प्रशासकीय मुख्यालय असलेल्या ‘नबान्ना’कडून याबाबतची अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या नव्या पदावर मिथुन चक्रवर्ती यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा (Cabinet Minister Rank) दर्जा बहाल करण्यात आला असून, नजीकच्या काळात ते आपल्या या नव्या पदाची सूत्रे हाती घेतील.

शुभेंदु अधिकारी यांच्या विभागाला देणार मोलाचा सल्ला
पश्चिम बंगालमधील माहिती, कला, संस्कृती आणि मनोरंजन या क्षेत्रांचे धोरणात्मक निर्णय घेणाऱ्या या अत्यंत महत्त्वाच्या विभागाची धुरा सध्या शुभेंदु अधिकारी यांच्याकडे आहे. या विभागात सल्लागार म्हणून काम करताना मिथुन चक्रवर्ती हे राज्य सरकारला विविध सांस्कृतिक धोरणांवर मोलाचा सल्ला देणार आहेत. काही काळापूर्वीच मिथुन चक्रवर्ती यांनी शुभेंदु अधिकारी हे पश्चिम बंगालसाठी सर्वात उत्तम मुख्यमंत्री ठरतील, असे विधान करून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा घडवून आणली होती.

हेही वाचा – राज्यसभा उमेदवारीवरून भाजपमध्ये असंतोष; माजी खासदार करणार पक्षाला रामराम? सोशल मीडियावरील ‘टाटा-बाय-बाय’ पोस्टने खळबळ

डाव्या विचारसरणीपासून ते भाजपपर्यंतचा मिथुन चक्रवर्तींचा राजकीय प्रवास
मिथुन चक्रवर्ती यांचा राजकीय प्रवास अत्यंत रंजक आणि बहुआयामी राहिला आहे:
– माओवादी चळवळ ते चित्रपटसृष्टी: तरुणपणात बंगालमधील माओवादी चळवळीशी जोडले गेलेले मिथुन चक्रवर्ती नंतर कौटुंबिक परिस्थितीमुळे अभिनयाकडे वळले आणि बॉलिवूडमध्ये ‘डिस्को डान्सर’ म्हणून प्रसिद्ध झाले.
– डावे पक्ष अन् तृणमूल काँग्रेस (TMC): सीपीएमच्या (CPM) काळात मुख्यमंत्री ज्योती बसू यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध होते. त्यानंतर एप्रिल 2014 मध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसकडून ते राज्यसभा खासदार बनले. मात्र शारदा चिटफंड घोटाळ्यात नाव आल्यानंतर त्यांनी डिसेंबर 2016 मध्ये खासदारकीचा राजीनामा दिला.
– भाजप प्रवेश अन् कोब्रा डायलॉग: 07 मार्च 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ब्रिगेड परेड ग्राऊंडवर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि आपल्या आक्रमक भाषणांनी व ‘कोब्रा’ डायलॉगने राज्यभरात मोठी प्रसिद्धी मिळवली.

पद्मभूषण पुरस्काराने सन्मान अन् नवीन जबाबदारीचे स्वागत
कला आणि सार्वजनिक क्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ योगदानाची दखल घेत भारत सरकारने 2024 मध्ये मिथुन चक्रवर्ती यांना देशातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘पद्मभूषण’ देऊन सन्मानित केले होते. आता पश्चिम बंगालच्या सांस्कृतिक धोरणाला दिशा देण्याची आणि राज्य सरकारला मार्गदर्शन करण्याची नवी संधी त्यांना मिळाली आहे. यामुले त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

हेही वाचा – लोकप्रतिनिधींच्या हाती जिल्ह्याची धुरा, पण ‘या’ कारणामुळे करता येणार नाही मतदान; पहा कोणत्या आमदाराला मतदानाला बंदी?

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number