Monday, November 17, 2025 06:23:14 AM

Punjab Flood: पठाणकोटमध्ये डोंगर कोसळला! लुधियानामध्ये लष्कर तैनात; पूरात आतापर्यंत 43 जणांचा मृत्यू

राज्यातील 23 जिल्ह्यांतील 1902 हून अधिक गावे पूराच्या पाण्याखाली आली आहेत, ज्यामुळे तब्बल 3.84 लाख लोक प्रभावित झाले आहेत.

punjab flood पठाणकोटमध्ये डोंगर कोसळला लुधियानामध्ये लष्कर तैनात पूरात आतापर्यंत 43 जणांचा मृत्यू

Punjab Flood: पंजाबमध्ये पूरस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून आतापर्यंत 43 जणांचा पाण्यामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील 23 जिल्ह्यांतील 1902 हून अधिक गावे पूराच्या पाण्याखाली आली आहेत, ज्यामुळे तब्बल 3.84 लाख लोक प्रभावित झाले आहेत. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी प्रत्येक बाधित गावात एक राजपत्रित अधिकारी नेमण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे लोक थेट त्यांच्याकडे आपली समस्या मांडू शकतील.

भाक्रा धरण धोक्याच्या उंबरठ्यावर

हिमाचलमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे भाक्रा धरणाची पातळी झपाट्याने वाढली आहे. धरणातील पाणी 1679 फूटांवर पोहोचले असून, फक्त 1 फूट धोक्याच्या पातळीखाली आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी बीबीएमबीने चारही पूर दरवाजे 9-9 फूटांनी उघडले. दरम्यान, 85 हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले असून, त्यातील 67 हजार क्युसेक पाणी सतलज नदीत गेले आहे. यामुळे नदीकाठच्या खेड्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

लुधियानामध्ये सैन्य तैनात

लुधियानाच्या सासराली कॉलनीजवळील धरण कमकुवत झाल्याने प्रशासनाने सतर्कता बाळगली आहे. तातडीने सैन्य आणि एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली असून, धरण मजबूत करण्याचे काम सुरू केले आहे. संपूर्ण गाव रिकामे करण्यात आले असून, लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे.

हेही वाचा - Mithun Chakraborty: कुणाल घोष अडचणीत; मिथुन चक्रवर्तींनी दाखल केला 100 कोटींचा मानहानी खटला

मदतकार्य वेगाने सुरू

पूरग्रस्त भागांत युद्धपातळीवर बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. मुख्यमंत्री प्रकृती अस्वास्थ्यामुळे भेट देऊ शकले नाहीत, मात्र आप प्रदेशाध्यक्ष अमन अरोरा यांनी अरविंद केजरीवाल यांच्यासोबत पूरस्थितीचे परीक्षण केले. केंद्र सरकारकडे 2000 कोटींच्या मदतीची मागणी करण्यात आली असून, थकीत 60 हजार कोटी रुपये सोडावेत अशी विनंती पंजाब सरकारने केली आहे.

हेही वाचा - SBI On GST 2.0 : फक्त 40 वस्तूंवरील करदरात वाढ; या आर्थिक वर्षात सरकारला होणार 3,700 हजार कोटींचं नुकसान, SBI चा अहवाल समोर

पठाणकोटमध्ये डोंगर कोसळले

पठाणकोटमध्ये पावसामुळे डोंगर कोसळण्याच्या घटना घडत आहेत. शाहपूर कांडी धरणाजवळ केरू डोंगराचा ढिगारा कोसळल्याने रस्ते बंद झाले आहेत. चक्की खड परिसरात डोंगर धसल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असून, स्थानिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.


सम्बन्धित सामग्री