Simhastha Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी रस्ता रुंदीकरणाची धडक मोहीम; मुख्यमंत्री मोहन यादव यांनी स्वतःच्या घरावर चालवला हातोडा

सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातून येणाऱ्या लाखो वाहनांची आणि भाविकांची गर्दी नियोजनबद्ध पद्धतीने हाताळण्यासाठी उज्जैन महापालिकेकडून विविध रस्ते रुंद केले जात आहेत.
MP CM Mohan Yadav
MP CM Mohan Yadav

Simhastha Kumbh Mela: आगामी ‘सिंहस्थ कुंभमेळा 2028’ च्या भव्य आयोजनासाठी मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठा वेग आला आहे. कुंभमेळ्यादरम्यान येणाऱ्या करोडो भाविकांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी महापालिकेने शहरात रस्ता रुंदीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. या विकासकामांमध्ये स्वतः राज्याचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या वडिलोपार्जित घराचा काही भाग अडथळा ठरत होता. मात्र, कोणताही विशेष अधिकार न वापरता मुख्यमंत्र्यांनी रविवारी सकाळी स्वतः हातामध्ये कुदळ आणि हातोडा घेऊन आपल्याच घराचे पाडकाम सुरू केले आणि या रुंदीकरण मोहिमेचा श्रीगणेशा केला.

9.80 कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ; मुख्यमंत्र्यांनी केली पूजा

अब्दालपुरा परिसरातील 730 मीटर लांबीचा हा रस्ता आता 15 मीटर रुंद केला जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी राज्य सरकारने 9.80 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. रविवारी सकाळी महापालिकेच्या टीमसह पोहचलेल्या मुख्यमंत्री यादव यांनी सर्वप्रथम आपल्या घराबाहेर शास्त्रोक्त पद्धतीने पूजा केली. त्यानंतर पोलीस प्रशासन, प्रसारमाध्यम प्रतिनिधी आणि नागरिकांच्या उपस्थितीत त्यांनी स्वतः पाडकामाची सुरुवात केली. यापूर्वी शनिवारीच महापालिकेने या मार्गावरील बाधित इमारतींवर लाल रंगाने खुणा केल्या होत्या.

हेही वाचा – Central Railway: आता दिवाळी, छठपूजेसाठी मध्य रेल्वेच्या स्पेशल 418 गाड्या धावणार; गाड्यांचे वेळापत्रक जाणून घ्या….

272 बांधकामे बाधित; मुख्यमंत्र्यांच्या कृतीने स्थानिकांकडून स्वतःहून पाडकाम
या रस्ता रुंदीकरणाच्या टप्प्यात एकूण 272 घरे आणि दुकानांचा काही भाग बाधित होत आहे. महापालिकेने सर्व बाधित मालमत्ताधारकांची मोजणी पूर्ण करून त्यांना पूर्वसूचना दिल्या होत्या. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून आपल्या वडिलोपार्जित घराचा भाग हटवून आदर्श निर्माण केल्यामुळे स्थानिक नागरिकांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ‘शहराच्या विकासासाठी आणि कुंभमेळ्याच्या यशस्वी नियोजनासाठी सहकार्य करणे हे आमचे कर्तव्य आहे,’ अशी भावना व्यक्त करत रहिवाशांनी स्वतःहून आपली अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात केली आहे.

कुंभमेळा 2028 साठी उज्जैनचा कायापालट; वाहतूक कोंडीमुक्त शहराचे ध्येय
सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातून येणाऱ्या लाखो वाहनांची आणि भाविकांची गर्दी नियोजनबद्ध पद्धतीने हाताळण्यासाठी उज्जैन महापालिकेकडून विविध रस्ते रुंद केले जात आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या कृतीमुळे प्रशासनाला नागरिकांचे मोठे सहकार्य मिळत असून, विकासकामांना गती मिळाली आहे. आगामी काळात उज्जैन शहराला जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा पुरवणे आणि रस्ते पूर्णपणे सुरक्षित व मोकळे करणे हाच या संपूर्ण मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा – Rahul Gandhi: ‘निवडणुकीत ज्ञानेश कुमार यांच्यावर मॅच-फिक्सिंगची जबाबदारी…’; मुख्य निवडणूक आयुक्तांवर राहुल गांधींचे गंभीर आरोप

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version