CJP Protester : ‘माझा कान जवळपास कापलाच…’; जंतर-मंतरवरील लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या विद्यार्थीनीने सांगितली भयंकर आपबीती

विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि शांततापूर्ण मार्गाने आवाज उठवण्यासाठी ती या आंदोलनात सहभागी झाली होती.

CJP Protester : ‘माझा कान जवळपास कापलाच…’; जंतर-मंतरवरील लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या विद्यार्थीनीने सांगितली भयंकर आपबीती

Jantar Mantar Lathicharge: दिल्लीतील जंतर-मंतरवर 20 जुलै रोजी झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान गंभीर जखमी झालेल्या झारखंडच्या नूतन टोप्पो या विद्यार्थिनीने त्या दिवशीचा थरार प्रसारमाध्यमांसमोर मांडला आहे. गुमला जिल्ह्यातील रहिवासी असलेली नूतन नोकरी सांभाळून स्पर्धा परीक्षांची तयारी करत होती. विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि शांततापूर्ण मार्गाने आवाज उठवण्यासाठी ती या आंदोलनात सहभागी झाली होती. सध्या तिच्यावर रांची येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अश्रूधूर आणि लाठीचार्चमुळे जंतर-मंतरवर गोंधळ
नूतनने दिलेल्या माहितीनुसार, 20 जुलैच्या दुपारी आंदोलन सुरू असताना पोलिसांनी अचानक वॉटर कॅननचा वापर करत अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि लाठीचार्ज सुरू केला. यामुळे तिथे उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड घबराट पसरली व जीव वाचवण्यासाठी सर्वांची धावपळ उडाली. या गोंधळातून बाहेर पडून ती राजीव चौकापर्यंत पोहोचली; मात्र काही वेळातच विद्यार्थ्यांनी पुन्हा एकत्र येत आंदोलन सुरू ठेवले, ज्यामुळे तिथली परिस्थिती अधिकच चिघळली.

गोळीबारासारखा आवाज अन् गंभीर दुखापत
परिस्थिती तणावपूर्ण होत असताना काही पोलीस कर्मचारी आपल्या दिशेने येत असल्याचे नूतनच्या निदर्शनास आले. तितक्यात तिला अचानक गोळीबारासारखा मोठा आवाज ऐकू आला आणि तिच्या उजव्या कानाला तीव्र दुखापत झाली. ही दुखापत पेलेट गनमुळे झाली, गोळी लागल्याने झाली की अन्य कोणत्या आघातामुळे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दुखापत अतिशय गंभीर असल्याने आंदोलक विद्यार्थ्यांनी तिला तात्काळ दिल्लीतील डॉ. राम मनोहर लोहिया (RML) रुग्णालयात दाखल केले.

हेही वाचा – Priyanka Gandhi : 'ते दहशतवादी आहेत का?'; आंदोलकांवर पेलेट गन्सच्या वापरावरून प्रियांका गांधींचा संताप

दोन तासांची शस्त्रक्रिया आणि निष्पक्ष चौकशीची मागणी
RML रुग्णालयात नूतनवर सुमारे 2 तास क्लिष्ट शस्त्रक्रिया करण्यात आली. या घटनेत तिचा उजवा कान जवळपास कापलाच गेला होता, असा दावा तिने केला आहे. प्राथमिक उपचारांनंतर डिस्चार्ज मिळाल्यावर ती पुढील उपचारांसाठी रांचीला परतली. या संपूर्ण प्रकाराची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी आक्रमक मागणी नूतनने केली आहे. आंदोलनाच्या वेळी अनेक पोलीस साध्या वेशात होते, तसेच गणवेशातील कर्मचाऱ्यांच्या नेमप्लेट्स दिसत नव्हत्या, असा आरोप करत जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी तिने केली आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number