सणासुदीचा काळ लक्षात घेऊन केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस दिला आहे, ज्यामुळे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरात दिवाळीचा आनंद वाढला आहे. भारत सरकारने कर्मचाऱ्यांसाठी बोनस आणि महागाई भत्ता (DA) वाढवण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना किती बोनस दिला आहे ते जाणून घेऊया.
केंद्र सरकारने महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ केली आहे. याचा अर्थ कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता 55 टक्क्यांवरून 58 टक्के झाला आहे. ही वाढ 1 जुलै 2025 पासून लागू झाली आहे. म्हणजेच गेल्या तीन महिन्यांचा महागाई भत्ता ऑक्टोबर महिन्याच्या पगारात थकबाकी म्हणून जोडला जाईल.
हेही वाचा - PM Kisan Yojana 21st Installment: दिवाळीआधी शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानच्या 21व्या हप्त्याबाबत मोठे अपडेट
यामुळे या सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांचे पगार वाढतील. केंद्र सरकारकडून वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढ होते. केंद्र सरकार ग्रुप C आणि नॉन-गैजेटेड ग्रुप B कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून 30 दिवसांचा पगार देणार आहे. हा बोनस त्यांच्या ऑक्टोबरच्या पगारासोबत दिला जाईल.
हेही वाचा - EPFO Update: EPF नियमात बदल; आता 'या' कर्मचाऱ्यांना EPS मध्ये योगदान देता येणार नाही
किती वाढला पगार ?
केंद्र सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या पगाराइतका उत्पादकता लिंक्ड बोनस (पीएलबी) मंजूर केला आहे. सरकारने 29 सप्टेंबर रोजी याची घोषणा केली आणि दसऱ्यापूर्वी ही रक्कम वितरित करण्यात आली. यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त 17,951 रुपयांचा बोनस मिळतो. सर्वात कमी महागाई भत्ता वाढ 18,000 रुपये मूळ पगार असलेल्या शिपायाच्या पगारात झाली आहे, ज्यामध्ये फक्त 540 रुपयांची वाढ झाली आहे.तसेच 2,25,000 रुपये मूळ वेतन मिळणाऱ्या अधिकाऱ्याच्या पगारात 6,750 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.