Tatkal Ticket New Rule: तत्काळ तिकीट बुकिंगसाठी नवा नियम लागू; आता काउंटरवर OTP देणे अनिवार्य

17 नोव्हेंबरपासून पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू झालेली ही पद्धत आता 52 गाड्यांमध्ये लागू करण्यात आली असून लवकरच ती देशभरातील सर्व तत्काळ गाड्यांसाठी लागू होणार आहे.

Tatkal Ticket New Rule: तत्काळ तिकीट बुकिंगसाठी नवा नियम लागू; आता काउंटरवर OTP देणे अनिवार्य

Tatkal Ticket New Rule: भारतीय रेल्वेने तत्काळ तिकीट बुकिंग प्रक्रियेत मोठा बदल करत ती आणखी सुरक्षित आणि पारदर्शक केली आहे. आता स्टेशन आरक्षण काउंटरवरून तत्काळ तिकीट बुक करताना प्रवाशांना त्यांच्या मोबाइलवर आलेला ओटीपी दाखवावा लागेल, अन्यथा तिकीट जारी केले जाणार नाही. 17 नोव्हेंबरपासून पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू झालेली ही पद्धत आता 52 गाड्यांमध्ये लागू करण्यात आली असून लवकरच ती देशभरातील सर्व तत्काळ गाड्यांसाठी लागू होणार आहे.

तिकीट बुकिंगची पद्धत कशी बदलेल?

नवीन नियमांनुसार प्रवाशांना स्टेशन काउंटरवर आरक्षण फॉर्ममध्ये मोबाइल नंबर नमूद करणे बंधनकारक असेल. त्यानंतर त्या नंबरवर एक ओटीपी पाठवला जाईल. प्रवाशाने तो ओटीपी काउंटर कर्मचाऱ्याला सांगितल्यावरच तिकिट दिलं जाईल. ओटीपी चुकीचा असल्यास तिकीट बुक केले जाणार नाही. रेल्वेच्या मते, या पद्धतीमुळे बनावट तिकिटे, फसवे बुकिंग, दलालांची मनमानी यांना आळा बसेल.

हेही वाचा – Android Phone Ban: 'या' देशाच्या सैन्यात Android Phone वर पूर्ण बंदी! सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी आता फक्त iPhone अनिवार्य

रेल्वे बोर्डाचे कार्यकारी संचालक (माहिती व प्रसिद्धी) दिलीप कुमार यांनीही या नव्या नियमांची माहिती दिली. रेल्वेच्या मते, अनेक वर्षांपासून तत्काळ तिकीट बुकिंगमध्ये दलालांकडून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत होता. खोट्या ओळखी, फेक मोबाइल नंबर वापरून या तिकिटांची मोठ्या प्रमाणात अडवणूक केली जात होती. ओटीपी-आधारित प्रणाली लागू केल्याने खऱ्या प्रवाशांना तिकिटे अधिक सहज मिळतील, दलालांचे फेक बुकिंग थांबेल, तिकीट प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता येईल.

डिजिटल तिकिटिंगमध्ये रेल्वेचा टप्प्याटप्प्याने बदल

भारतीय रेल्वेने डिजिटल तिकिटिंगमध्ये आधीच अनेक बदल केले आहेत. जुलै 2025 मध्ये, ऑनलाइन तत्काळ तिकिट बुकिंगसाठी आधार-आधारित प्रमाणीकरण सुरू करण्यात आले. त्यानंतर, ऑक्टोबर 2025 मध्ये, सर्व सामान्य आरक्षणांच्या पहिल्या दिवसाच्या बुकिंगसाठी ओटीपी-आधारित ऑनलाइन प्रणाली लागू करण्यात आली. प्रवाशांकडून याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि तिकिटांमध्ये पारदर्शकता वाढली. रेल्वेने आता हे मॉडेल काउंटर बुकिंगपर्यंत वाढवले ​​आहे.   

हेही वाचा – Sanchar Saathi App: Apple-Google सरकारी आदेशाला कायदेशीर आव्हान देण्याची शक्यता; युजर्सच्या प्रायव्हसी आणि सिक्युरिटीची व्यक्त केली चिंता

लवकरच सर्व गाड्यांसाठी लागू

रेल्वे आता ही प्रणाली देशातील सर्व तत्काळ गाड्यांसाठी अनिवार्य करण्याची तयारी करत आहे. यामुळे तत्काळ तिकिटांचा गैरवापर पूर्णपणे कमी होईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number