Mahatma Gandhi Birth Anniversary : गांधी जयंती विशेष!; स्वच्छ भारत मिशनमुळे ODF Plus गावांची नवी ओळख

गांधी जयंतीनिमित्त स्वच्छतेचा विचार पुन्हा केंद्रस्थानी आला आहे. स्वच्छ भारत मिशनमुळे आज 4 लाखांहून अधिक गावे ODF Plus म्हणून घोषित झाली आहेत.

Mahatma Gandhi Birth Anniversary : गांधी जयंती विशेष!; स्वच्छ भारत मिशनमुळे ODF Plus गावांची नवी ओळख

उद्या होणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने स्वच्छतेचा विचार पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे. महात्मा गांधींनी दिलेला "देशाच्या उन्नतसाठी स्वच्छता अधिक महत्त्वाची” हा संदेश आजही तितकाच सुसंगत ठरत आहे. गेल्या 11 वर्षांत स्वच्छ भारत अभियानाने देशभरात एक लोकचळवळ, म्हणजेच जनआंदोलन स्वरूप धारण केले आहे. भारताला खुले शौचमुक्त करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोनातून सुरू झालेल्या या उपक्रमाने आता “विचार स्वच्छता, संस्कार स्वच्छता” या विचारांना चालना देत आहे.
 
ग्रामीण भागातील स्वच्छ भारत मिशन (SBM-Grameen) अंतर्गत 11.5 कोटींपेक्षा अधिक शौचालये उभारली गेली आहेत. आज 4 लाखांहून अधिक खेडी ODF Plus model म्हणून घोषित झाली असून, या गावांमध्ये केवळ शौचालयेच नाहीत तर घन व द्रवकचरा व्यवस्थापनाच्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत. ओपन डिफेकेशन फ्री (ODF) म्हणजेच खुले शौचमुक्त गाव हे असे गाव जिथे कोणीही खुले मैदान, रस्ते किंवा पाणवठ्याजवळ शौचाला जात नाही, आणि प्रत्येकाकडे सुरक्षित शौचालयाची सोय उपलब्ध आहे.त्यामुळे ही गावे दृश्य स्वरूपात स्वच्छ दिसतात आणि ग्रामस्थांना दीर्घकालीन सुविधा पुरवतात.
 
या अभियानाचा खरा परिणाम फक्त आकडेवारीत दिसत नाही, तर ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनशैलीत झालेल्या बदलांमध्येही तो अनुभवता येतो. महिलांना, लहान मुलांना आता दूरवर जाऊन शौच करावे लागत नाही, मुलांचे आरोग्य सुधारले आहे, पाण्याचे स्त्रोत आणि नद्या स्वच्छ ठेवण्यात प्रगती झाली आहे. अनेक ठिकाणी ग्रामपंचायती व महिला बचतगट स्वतःहून कचरा व्यवस्थापनाची जबाबदारी घेत आहेत.
 
स्वच्छ भारत मिशनची दिशा आता पायाभूत सुविधांपलीकडे जाऊन दीर्घकालीन वर्तनात्मक बदलांकडे वळली आहे. ODF ते ODF Plus Model हा प्रवास फक्त बांधकामांचा नसून शाळा, अंगणवाड्या आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेची संस्कृती रुजवण्याचा आहे. यामुळे स्वच्छता ही केवळ आरोग्य वा सन्मानाची गोष्ट न राहता ती विकास आणि संधीचे साधन ठरत आहे.यावर्षीही अनेक समाजघटकांनी एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा वापर कमी करून, कचरा वर्गीकरणाला चालना देऊन व पर्यावरणपूरक सुविधा स्वीकारून स्वच्छतेला संस्कारांचा भाग बनवले आहे.

 
आता या मोहिमेचा पुढचा अध्याय स्वच्छतेच्या आर्थिक मूल्याकडे नेणारा आहे. पर्यटनवाढ, उद्योगांना आकर्षण, स्थानिक रोजगारनिर्मिती आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा उंचावणे, हे सगळे घटक स्वच्छतेशी थेट जोडलेले आहेत. त्यामुळे स्वच्छ भारत मिशन हे केवळ आरोग्य आणि सन्मानापुरते न राहता आर्थिक प्रगतीचे साधन म्हणून पुढे नेणे ही आजची गरज आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number