Pahalgam Terror Attack: राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ला प्रकरणात मोठी कारवाई करत पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबा (एलईटी) आणि त्याची आघाडी संघटना द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) यांच्यासह सात आरोपींविरुद्ध आज अधिकृत आरोपपत्र दाखल केले आहे. हे आरोपपत्र जम्मू येथील एनआयएच्या विशेष न्यायालयात सादर करण्यात आले असून, या हल्ल्यामागील पाकिस्तानप्रायोजित कटाचा सविस्तर उलगडा करण्यात आला आहे.
एनआयएने दाखल केलेल्या 1597 पानांच्या आरोपपत्रात दहशतवादी हल्ल्याच्या नियोजनापासून ते अंमलबजावणीपर्यंतचा संपूर्ण तपशील नमूद करण्यात आला आहे. या प्रकरणात प्रतिबंधित एलईटी/टीआरएफ या संघटनांवर पहलगाम हल्ल्याचे नियोजन, दहशतवाद्यांना मदत, शस्त्रसाठ्याची व्यवस्था आणि स्थानिक नेटवर्कच्या सहाय्याने हल्ला राबवण्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या हल्ल्यात धर्माच्या आधारावर लक्ष्यित हत्या करण्यात आल्या असून, त्यात 25 पर्यटक आणि एक स्थानिक नागरिकाचा मृत्यू झाला होता, ज्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती.
हेही वाचा – Pune Crime: महिलेने हॉर्न वाजवताच संतापला दुचाकीस्वार; पाठलाग करून केलं भयंकर कृत्य
साजिद जट्ट मुख्य आरोपी
आरोपपत्रात पाकिस्तानमधील दहशतवादी हँडलर साजिद जट्ट यालाही मुख्य आरोपी म्हणून नमूद करण्यात आले आहे. एनआयएच्या तपासानुसार, साजिद जट्ट याने या हल्ल्याचे नियोजन करून काश्मीरमधील दहशतवाद्यांना थेट सूचना दिल्या होत्या. तसेच, या हल्ल्यानंतर काही आठवड्यांनी जुलै 2025 मध्ये श्रीनगरच्या दाचीगाम परिसरात राबवण्यात आलेल्या ‘ऑपरेशन महादेव’ दरम्यान भारतीय सुरक्षा दलांनी ठार केलेल्या तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांची नावेही आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आली आहेत. या दहशतवाद्यांची ओळख फैसल जट्ट उर्फ सुलेमान शाह, हबीब ताहीर उर्फ जिब्रान आणि हमजा अफगाणी अशी पटली आहे.
हेही वाचा – Pune Crime: शिकवणी वर्गात रक्तरंजित थरार! शिक्षक शिकवत असतानाच विद्यार्थ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू
The National Investigation Agency (NIA) today chargesheeted seven accused in the Pahalgam terror attack case, including the Pakistan-based Lashkar-e-Taiba (LeT) / The Resistance Front (TRF) terrorist organisation.
The chargesheet, which details Pakistan’s conspiracy, roles of… pic.twitter.com/MICJowKZaz — ANI (@ANI) December 15, 2025
एनआयएच्या या कारवाईमुळे पहलगाम हल्ल्यामागील आंतरराष्ट्रीय दहशतवादी कट स्पष्ट झाला असून, पाकिस्तान प्रायोजित दहशतवादाविरोधातील भारताची भूमिका अधिक ठाम झाल्याचे पाहायला मिळत आहे.