Ayushman Card Helpline Number: आयुष्मान भारत योजनेत नोंदणीकृत कार्डधारकांसाठी मोठा सोपा उपाय सध्या सुरू झाला आहे. उत्तर प्रदेश सरकारने कॉल सेंटर सुविधा सुरु केली असून, आता रुग्ण फक्त फोनवर कॉल करून घरच्या आरामात अपॉइंटमेंट बुक करू शकतात. त्यामुळे आता रुग्णांना रुग्णालयात लांब रांगेत थांबण्याची पडणार गरज नाही.
अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी क्रमांक
उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी अटल बिहारी वाजपेयी सायंटिफिक कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सांगितले की, कार्डधारक फक्त 180018004444 या टोल-फ्री क्रमांकावर कॉल करून अपॉइंटमेंट बुक करू शकतात.
हेही वाचा - Government On DeepFake Content : सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या डीपफेक कंटेंटवर लगाम; सरकारचा नवा कायदा लवकरच लागू
आयुष्मान भारत योजना म्हणजे काय?
आयुष्मान भारत योजना ही भारत सरकारद्वारे चालवली जाणारी आरोग्य विमा योजना आहे. या योजनेअंतर्गत, प्रति कुटुंब दरवर्षी 5 लाख रुपयांचा मोफत विमा दिला जातो. हे कार्ड देशभरातील कोणत्याही खाजगी किंवा सार्वजनिक रुग्णालयात वापरता येते. ही योजना 10 कोटींहून अधिक गरीब आणि असुरक्षित कुटुंबांना लाभ देण्यासाठी डिझाइन केलेली आहे.
आयुष्मान कार्ड कसे बनवायचे?
तुमच्या मोबाईलवर आयुष्मान अॅप डाउनलोड करा.
भाषा निवडा आणि लॉग इन करा.
लाभार्थीवर क्लिक करा, कॅप्चा आणि मोबाइल नंबर प्रविष्ट करा.
योजना म्हणून PM-JAY निवडा, राज्य व जिल्हा निवडा, आधार क्रमांक टाका.
हेही वाचा - UPI Transactions: UPI झाला डिजिटल इंडियाचा ‘राजा’! ऑक्टोबरमध्ये दररोज 94,000 कोटींचे व्यवहार; सणासुदीचा हंगाम ठरला गेमचेंजर
यानंतर, तुम्हाला सदस्याचा मोबाईल नंबर आणि त्याचा तुमच्याशी असलेला संबंध भरावा लागेल. अशा प्रकारे e-KYC पूर्ण केल्यानंतर, तुम्हाला फॉर्म सबमिट करावा लागेल. सर्व माहिती पडताळल्यानंतर, त्या सदस्याचे आयुष्मान कार्ड बनवले जाईल.