Aadhaar Card-Voter ID Linking
Edited Image
Aadhaar Card-Voter ID Linking: बनावट मतदान आणि बनावट मतदार ओळखपत्रांना आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने मतदार ओळखपत्र आधार कार्डशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. आता देशातील नागरिकांना त्यांचे मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करावे लागेल. प्राप्त माहितीनुसार, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांनी आज निर्वाचन सदन येथे केंद्रीय गृह सचिव, विधिमंडळ विभागाचे सचिव, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव आणि यूआयडीएआयचे सीईओ आणि निवडणूक आयोगाच्या तांत्रिक तज्ञांसोबत बैठक घेतली.
मतदार ओळखपत्र आधार कार्डशी आधार कार्डसोबत लिंक करण्यात येणार -
मतदार ओळखपत्र आधार कार्डशी जोडण्याचे काम संविधानाच्या कलम 326 मधील तरतुदींनुसार केले जाईल, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. लवकरच निवडणूक आयोग आणि UIDAI चे तज्ञ आधार-मतदार कार्ड लिंकेजवर तांत्रिक सल्लामसलत सुरू करतील. यानंतर लिंकिंग प्रक्रिया सुरू करण्यात येईल.
हेही वाचा - Ladki Bahin Yojana Update: 'या' महिलांना एक रुपयाही नाही मिळणार; मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत होत आहे 'हा' मोठा बदल
निवडणूक आयोगाने जारी केले निवेदन -
दरम्यान, निवडणूक आयोगाने एका निवेदनात म्हटले आहे की, संविधानाच्या कलम 326 नुसार, मतदानाचा अधिकार फक्त भारताच्या नागरिकालाच दिला जाऊ शकतो, परंतु आधार केवळ व्यक्तीची ओळख स्थापित करतो. म्हणून, असा निर्णय घेण्यात आला की मतदार छायाचित्र ओळखपत्र (EPIC) आधारशी जोडणे हे संविधानाच्या कलम 326 लोकप्रतिनिधी कायदा, 1950 च्या कलम 23 (4), 23 (5) आणि 23 (6) आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या तरतुदींनुसारच केले जाईल. आयोगाने म्हटले आहे की कायदा मतदार यादी स्वेच्छेने आधार डेटाबेसशी जोडण्याची परवानगी देतो.
हेही वाचा - 8th Pay Commission: जानेवारी 2026 मध्ये आठवा वेतन आयोग लागू होईल का? अहवाल सादर करण्यासाठी किती वेळ लागेल? जाणून घ्या?
बनावट कागदपत्रांच्या आधारे मतदार ओळखपत्र बनवल्याप्रकरणी 2 जणांना अटक -
काही महिन्यापूर्वी बनावट कागदपत्रांच्या आधारे मतदार ओळखपत्र बनवल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी दिल्लीत दोघांना अटक केली होती. निवडणूक नोंदणी अधिकारी (ERO) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तक्रारीच्या चौकशीदरम्यान, दोघांना अटक करण्यात आली आणि त्यांच्याकडून बनावट कागदपत्रे जप्त करण्यात आली होती. अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी आता निवडणूक आयोगाने आधार कार्ड आणि मतदार कार्ड लिंक करण्याचा निर्णय घेतला आहे.