नवरात्रौत्सव, दसरा…ऑक्टोबर महिन्यात इतक्या सार्वजनिक सुट्ट्या; RBI कडून यादी जाहीर, ‘या’ 12 दिवशी बँका राहणार बंद

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) प्रसिद्ध केलेल्या अधिकृत सुट्ट्यांच्या वेळापत्रकानुसार, वेगवेगळ्या राज्यांमध्ये स्थानिक सणांनुसार बँकांच्या कामकाजावर परिणाम होणार आहे.

नवरात्रौत्सव, दसरा…ऑक्टोबर महिन्यात इतक्या सार्वजनिक सुट्ट्या; RBI कडून यादी जाहीर, ‘या’ 12 दिवशी बँका राहणार बंद
ऑक्टोबरमध्ये बँकांना 12 दिवस सुट्ट्या, पहा संपूर्ण यादी

October 2026 bank holidays list: आगामी ऑक्टोबर 2026 या महिन्यात विविध राष्ट्रीय सण, स्थानिक उत्सव आणि साप्ताहिक सुट्ट्यांमुळे बँका मोठ्या प्रमाणात बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) प्रसिद्ध केलेल्या अधिकृत सुट्ट्यांच्या वेळापत्रकानुसार, वेगवेगळ्या राज्यांमध्ये स्थानिक सणांनुसार बँकांच्या कामकाजावर परिणाम होणार आहे.

  • या महिन्याची सुरुवातच 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीच्या राष्ट्रीय सुट्टीने होणार असून, या दिवशी देशभरातील सर्व बँक शाखा पूर्णपणे बंद राहतील.
  • याशिवाय 10 ऑक्टोबरला दुसरा शनिवार आणि 24 ऑक्टोबरला चौथा शनिवार असल्याने नियमित सुट्टी असेल.
  • तसेच 5, 11, 18 आणि 25 ऑक्टोबर रोजी येणाऱ्या चार रविवारी बँकांचे कामकाज होणार नाही.

त्रिपुरा आणि पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक सुट्ट्या

विविध राज्यांतील स्थानिक सण जसे की दुर्गापूजा, विजयादशमी आणि लक्ष्मीपूजा यामुळे सुट्ट्यांचे प्रमाण वेगवेगळे आहे. आरबीआयच्या यादीनुसार, त्रिपुरा राज्यात ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक 12 दिवस बँका बंद राहतील. येथे सणांच्या विशेष सुट्ट्यांसह शनिवार व रविवार मिळून हा आकडा गाठला गेला आहे. यापाठोपाठ पश्चिम बंगालमध्ये सुमारे 11 दिवस, तर गंगटोक (सिक्कीम) मध्ये 10 दिवस बँकांना सुट्टी असणार आहे. त्यामुळे बँकेत प्रत्यक्ष जाऊन करायची महत्त्वाची कामे ग्राहकांनी आधीच पूर्ण करून ठेवणे सोयीचे ठरेल.

हेही वाचा – FASTag ॲन्युअल पासची मोठी कामगिरी; विक्रीचा कोटींचा टप्पा पार, जाणून घ्या पात्रता अन् अर्ज करण्याची सोपी पद्धत

डिजिटल बँकिंग आणि एटीएम सेवा 24 तास सुरू; चेक क्लिअरिंगवर परिणाम शक्य

बँकांच्या शाखा प्रत्यक्ष बंद असल्या तरीही सर्वसामान्यांना दिलासा देणारी बाब म्हणजे डिजिटल सेवा सुरू राहतील. युपीआय (UPI), एटीएम (ATM), नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगच्या सुविधा 24 तास उपलब्ध असतील. मात्र, धनादेश (Check Clearing) वटवणे किंवा इतर कागदपत्रांशी संबंधित कामांसाठी ग्राहकांना शाखेत जावे लागणार असल्याने, सुट्ट्यांचे वेळापत्रक पाहूनच आर्थिक व्यवहारांचे नियोजन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number