Tuesday, May 20, 2025 03:01:20 PM

भारतीय लष्कराने पाकिस्तानची दोन लढाऊ विमाने JF-17 पाडली; अनेक क्षेपणास्त्रेही केली नष्ट

पाकिस्तानी सैन्याच्या अत्याधुनिक लढाऊ विमानांपैकी दोन JF-17 पाडण्यात आले आहेत. याशिवाय पाकिस्तानची आठ क्षेपणास्त्रेही नष्ट करण्यात आली.

भारतीय लष्कराने पाकिस्तानची दोन लढाऊ विमाने jf-17 पाडली अनेक क्षेपणास्त्रेही केली नष्ट

नवी दिल्ली : भारतीय लष्कराने पाकिस्तानची दोन लढाऊ विमाने JF-17 पाडली. याशिवाय शनिवारी रात्री पाकिस्तानने जम्मूमधील सतवारी, सांबा, आरएस पुरा आणि अर्नियाच्या दिशेने 8 क्षेपणास्त्रे डागली. पण दिलासा देणारी गोष्ट म्हणजे भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने सर्व क्षेपणास्त्रे वेळीच थांबवली. कोणत्याही क्षेपणास्त्रांनी त्यांचे लक्ष्य गाठले नाही.

भारतावर हल्ला करण्यासाठी आलेली दोन पाकिस्तानी JF-17 लढाऊ विमाने भारतीय हवाई संरक्षण दलाने पाडली. पाकिस्तानी लष्करानेही ही विमाने पाडल्याचे मान्य केले आहे. जम्मू यूनिव्हर्सिटीजवळ दोन पाकिस्तानी ड्रोन आढळले आहेत. हेही भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने पाडले आहेत.

पाकिस्तानचा हल्ला करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला आहे. पाकिस्तानी सैन्याच्या अत्याधुनिक लढाऊ विमानांपैकी दोन JF-17 पाडण्यात आले आहेत. याशिवाय पाकिस्तानची आठ क्षेपणास्त्रेही नष्ट करण्यात आली. पाकिस्तानी सैन्याच्या सध्याच्या हालचाली हमासच्या दहशतवाद्यांसारख्या असल्याचे लष्करी तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

F-16 देखील पाडले
दोन JF-17 व्यतिरिक्त, एक पाकिस्तानी लढाऊ विमान F-16 देखील भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने पाडले आहे.

हेही वाचा - 'पाकिस्तान तर जन्मापासूनच खोटे बोलत आहे,' UNSC मध्ये भारताचा हल्लाबोल

चीनने पाकिस्तानला JF-17 लढाऊ विमान दिले आहे
JF-17 ची लांबी सुमारे 14.9 मीटर, पंखांचा विस्तार 9.45 मीटर आणि उंची सुमारे 4.77 मीटर आहे. त्याचे जास्तीत जास्त टेकऑफ वजन 12,474 किलो पर्यंत आहे. हे विमान रशियन Klimov RD-93 किंवा चिनी Guizhou WS-13 टर्बोफॅन इंजिनद्वारे चालवले जाते, ज्यामुळे ते जास्तीत जास्त Mach 1.6(सुमारे 1,910 किमी/तास) वेग मिळवू शकते.

हे विमान 7 हार्डपॉइंट्सवर 1,500 किलोपर्यंत शस्त्रे वाहून नेऊ शकते. यामध्ये हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे, हवेतून जमिनीवर मारा करणारी बॉम्ब आणि जहाजविरोधी क्षेपणास्त्रे यांचा समावेश आहे. त्याच्या शस्त्रांमध्ये चिनी पीएल-5, पीएल-12, पीएल-15 क्षेपणास्त्रे आणि जीपीएस-मार्गदर्शित बॉम्ब यांचा समावेश आहे, ज्यामुळे ते हवेत आणि पृष्ठभागावरील लक्ष्यांवर हल्ला करू शकते.

जम्मूच्या आकाशात दिसला हल्ला; एकाच वेळी अनेक क्षेपणास्त्रे
जम्मूमध्ये ज्या प्रकारे आकाशात एकाच वेळी क्षेपणास्त्रे दिसली, त्याचप्रमाणे अलीकडे इस्रायलमध्ये हमासच्या हल्ल्यादरम्यानही असेच दृश्य दिसले होते. एकाच वेळी अनेक लहान, स्वस्त क्षेपणास्त्रे डागण्यात आली, ज्यांचा उद्देश मोठे नुकसान करणे नव्हता; तर, भीती पसरवणे होता.

जम्मूमध्ये कुठे कुठे झाले ड्रोन हल्ले?

पाकिस्तानने ड्रोनने हल्ला करण्याचा प्रयत्न केलेल्या ठिकाणांमध्ये जम्मू विमानतळ, जम्मू रेल्वे स्टेशन, चन्नी हिम्मत आणि जम्मूला लागून असलेला सीमावर्ती भाग आरएस पुरा यांचा समावेश आहे. भारताच्या हवाई संरक्षण प्रणाली S-400 ने पाकिस्तानच्या या हल्ल्याच्या प्रयत्नांना हाणून पाडले.

पाकिस्तानचे सैन्य हमासच्या दहशतवाद्यांसारख्या पवित्र्यात दिसत आहे
या हल्ल्यानंतर, लष्करी तज्ज्ञांचे मत आहे की, पाकिस्तानी सैन्य आता पूर्णपणे दहशतवादी संघटनेसारखे वागत आहे. अशा कृती थेट हमाससारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित आहेत. पाकिस्तानी सैन्य हमासच्या दहशतवाद्यांसारख्या पवित्र्यात दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान प्रेरित दहशतवादी आणि दहशतवादी संघटना हमास या पॅलेस्टिनी दहशतवादी संघटनेने इस्रालयवर ज्या प्रकाराने हल्ले केले, तसेच तंत्र अवलंबताना दिसत आहेत. आतापर्यंत केवळ दहशतवाद्यांबाबत ही गोष्ट बोलली जात होती. आता पाकिस्तानचे लष्कर हमासच्या दहशतवाद्यांच्या मार्गावर गेल्याचे दिसते आहे.

हेही वाचा - 'अजून पुरावे हवेत का?' पाकिस्तानी झेंड्यामध्ये लपेटून राष्ट्रीय इतमामात दहशतवाद्यांचा अंत्यविधी


सम्बन्धित सामग्री