Monday, May 12, 2025 08:43:11 PM

खतरनाक ‘Dance of the Hillary’ व्हायरस; पाकिस्तानकडून सायबर हल्ल्याची नवी खेळी

पाकिस्तानकडून भारतावर ‘Dance of the Hillary’ नावाचा सायबर हल्ला; व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवरून व्हायरस पाठवून नागरिकांची वैयक्तिक व आर्थिक माहिती चोरण्याचा प्रयत्न.

खतरनाक ‘dance of the hillary’ व्हायरस पाकिस्तानकडून सायबर हल्ल्याची नवी खेळी

नवी दिल्ली: भारतावर वारंवार अपयशी ठरलेल्या हल्ल्यांनंतर पाकिस्तान आता सायबर हल्ल्याच्या माध्यमातून नवे षड्यंत्र रचत आहे. दहशतवाद, ड्रोन हल्ले यानंतर आता सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतावर एक नव्या प्रकारचा हल्ला करण्यात येत आहे .‘Dance of the Hillary’ नावाचा घातक व्हायरस भारतीय नागरिकांच्या मोबाइल आणि संगणकांपर्यंत पोहोचवला जात आहे.

हा व्हायरस व्हिडीओ किंवा डॉक्युमेंट फाइलच्या स्वरूपात WhatsApp, Facebook, Telegram आणि ईमेलसारख्या माध्यमातून पाठवला जात आहे. ‘Dance of the Hillary’ या व्हायरसचा उद्देश वापरकर्त्यांच्या वैयक्तिक माहितीवर हल्ला करणे, बँक डिटेल्स चोरी करणे आणि आर्थिक नुकसान घडवणे हा आहे.

व्हायरस कसा पसरतो?

हा व्हायरस प्रामुख्याने tasksche.exe नावाच्या फाईलच्या माध्यमातून पसरतो. जर तुम्हाला कुठल्याही अनोळखी व्यक्तीकडून लिंक किंवा अटॅचमेंट आली असेल, विशेषतः या नावाची फाईल, तर ती उघडण्याचे मोठे परिणाम होऊ शकतात. एकदा का ही फाईल तुमच्या डिव्हाईसमध्ये ओपन झाली, की त्यामधील मालवेअर अ‍ॅक्टिव्ह होऊन तुमच्या माहितीवर ताबा मिळवतो.

कोणत्या गोष्टींपासून सावध राहावे?

अनोळखी फाईल्स किंवा लिंक्स: WhatsApp, Telegram, Facebook किंवा ईमेलवरून आलेल्या अनोळखी फाईल्स किंवा लिंक्सवर क्लिक करू नका.

tasksche.exe नावाची फाईल दिसल्यास तिला त्वरित डिलीट करा.

फिशिंग मेल्स: लुभावणाऱ्या ऑफर्स किंवा खोट्या ईमेलद्वारे व्हायरस तुमच्या डिव्हाइसपर्यंत पोहोचवला जातो.

स्वतःचा बचाव कसा कराल?

1. अप-टू-डेट अँटीव्हायरस: तुमच्या डिव्हाईसमध्ये चांगल्या दर्जाचा अँटीव्हायरस असावा.

2. ऑपरेटिंग सिस्टिम अपडेट ठेवा: तुमचा संगणक किंवा मोबाइल सतत अपडेटेड ठेवा.

3. मजबूत पासवर्ड वापरा: सोशल मीडिया, बँकिंग आणि ईमेल खात्यांमध्ये स्ट्राँग पासवर्ड वापरा.

4. फक्त अधिकृत अ‍ॅप डाउनलोड करा: Google Play Store किंवा Apple Store वगळता इतर कुठूनही अ‍ॅप्स डाउनलोड करू नका.

5. सायबर सिक्युरिटी जागरुकता ठेवा: सतत नवीन प्रकारचे हल्ले होत असल्याने आपली माहिती अपडेट ठेवणे आवश्यक आहे.

तुमच्यावर हल्ला झाला तर काय कराल?

जर चुकून तुम्ही अशा कुठल्याही फाईलवर क्लिक केलं असेल आणि त्याचा परिणाम म्हणून आर्थिक नुकसान किंवा माहिती चोरी झाली असेल, तर लगेच 1930 या नेशनल सायबर क्राईम हेल्पलाइन नंबरवर कॉल करा. त्यांना संपूर्ण माहिती द्या आणि अधिकृत तक्रार नोंदवा.

आजच्या डिजिटल युगात फक्त बॉर्डरवरील सुरक्षा पुरेशी नाही, तर ऑनलाइन जगातही सावध राहणं तितकंच गरजेचं आहे. ‘Dance of the Hillary’ सारखे व्हायरस केवळ तुमच्या माहितीची चोरी करत नाहीत, तर देशाच्या सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह उभं करतात. त्यामुळे सतर्क राहा, सुरक्षित राहा.
 


सम्बन्धित सामग्री