सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरुच, पाककडून सलग 12व्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन

पाकिस्तानी लष्कराने सलग 12 दिवस सीमेवर गोळीबार करत भारतीय सैन्याच्या संयमाची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न केला आहे.

सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरुच, पाककडून सलग 12व्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन

जम्मू काश्मीर: पहलगाम जवळील बैसरन पठारावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंध पुन्हा एकदा ताणले गेले आहेत. 22 एप्रिल रोजी झालेल्या या हल्ल्यापासून पाकिस्तानकडून सातत्याने सीमेपलिकडून कुरापती सुरू असून, शस्त्रसंधीचा भंग होत आहे. पाकिस्तानी लष्कराने सलग 12 दिवस सीमेवर गोळीबार करत भारतीय सैन्याच्या संयमाची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न केला आहे. भारताकडूनही याला ठोस प्रत्युत्तर देण्यात येत असले, तरी पाकिस्तानची उकळलेली धूळ अजून शांत झालेली नाही.

या गोळीबारांमुळे सीमावर्ती भागांमध्ये पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. जम्मू आणि काश्मीरच्या विविध सीमेवर विशेषतः पुंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी, अखनूर आणि बारामुला सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून केलेल्या गोळीबाराचे वृत्त आहे. भारताने शांतता राखण्याचा प्रयत्न केला असतानाही, पाकिस्तानकडून उद्दामपणाने शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरूच आहे.

हेही वाचा: भारत – पाकिस्तान तणावानंतर गृहमंत्रायलाचे निर्देश; 7 मे रोजी देशव्यापी 'मॉक ड्रिल'

भारत सरकारने आता या कुरघोड्यांना तितक्याच कठोरपणे उत्तर देण्याची भूमिका घेतली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानवर दबाव वाढवण्यासाठी महत्त्वाची पावलं उचलण्यात आली आहेत. भारताने सिंधू जल करार स्थगित केला असून, पाकिस्तानसोबतची वाघा-अटारी सीमेची वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत आणि त्यांना परत पाठवण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. एवढंच नव्हे, तर भारताने पाकिस्तानसाठी आपली हवाई हद्दही बंद केली आहे आणि दोन्ही देशांमधील टपाल व व्यापार सेवा थांबवली आहे.

हेही वाचा: उद्या देशभरात जनतेचा ‘युद्धसराव’, आपत्कालीन स्थितीत काय कराल? संरक्षण तज्ज्ञांनी दिल्या 'या' सुचना

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number