बिहारची राजधानी पटना येथील दानापूर परिसरात बुधवारी (29 एप्रिल 2026) संध्याकाळी वादळी वाऱ्यांदरम्यान एक भीषण दुर्घटना घडली. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची भिंत कोसळल्याने दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
ही घटना रुकनपुरा देवी स्थान परिसरात घडली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, जोरदार वाऱ्यांमुळे इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील भिंतीचा काही भाग अचानक कोसळला. त्या वेळी रस्त्याने जाणारे दोन नागरिक या ढिगाऱ्याखाली अडकले.
घटना घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. त्यांनी ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांना बाहेर काढले आणि तातडीने रुग्णालयात हलवले. जखमींपैकी सनी कुमार यांना राजा बाजार येथील परस रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर दुसऱ्या जखमीला कुर्जी होली फॅमिली रुग्णालयात नेण्यात आले.
VIDEO | Bihar: Two dead after wall of under-construction building collapses during severe storm in Danapur.#BiharNews (Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/QpHMz0aGTo — Press Trust of India (@PTI_News) April 30, 2026
मात्र उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला आहे. दुसऱ्या मृत व्यक्तीची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही. या घटनेनंतर पोलिस आणि प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
दानापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शशी भूषण सिंग यांनी सांगितले की, या दुर्घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले होते, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली असून, बांधकामातील निष्काळजीपणा कारणीभूत होता का, याची तपासणी केली जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, ही इमारत एका स्थानिक मालकाशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. मात्र, याबाबतची अधिकृत पडताळणी सुरू आहे. या दुर्घटनेमुळे बांधकाम सुरक्षेच्या नियमांबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.