Wednesday, November 19, 2025 12:52:53 PM

Piyush Goyal: पीयूष गोयल यांचा उद्योग प्रतिनिधींशी संवाद; ‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’वर भर

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी निर्यात वाढीसाठी उद्योग क्षेत्राशी चर्चा केली. गुणवत्तेवर आधारित टिकाऊ वाढ, नवीन बाजारपेठा आणि मुक्त व्यापार करारांचा जास्तीत जास्त वापर यावर भर देण्यात आला.

piyush goyal पीयूष गोयल यांचा उद्योग प्रतिनिधींशी संवाद ‘मेक इन इंडिया मेक फॉर द वर्ल्ड’वर भर

नवी दिल्ली : भारताची निर्यात वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडून मोठी तयारी सुरू आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी विविध एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल्स (Expert Promotion Council) आणि उद्योग संघटनांच्या प्रतिनिधींशी एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत भारताच्या निर्यातीला गती देण्यासाठी नवी रणनीती आखण्यात आली.
 
बैठकीनंतर पीयूष गोयल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) वर माहिती दिली. त्यांनी लिहिले, “विविध क्षेत्रातील उद्योग प्रतिनिधींसोबत भारताच्या निर्यात वाढीसाठी रणनीतीवर चर्चा केली. आपले उद्दिष्ट म्हणजे गुणवत्तेवर आधारित आणि टिकाऊ वाढ साध्य करणे आहे.”
 
गोयल यांनी सांगितले की या चर्चेत काही महत्त्वाचे मुद्दे ठरवण्यात आले. त्यात मुक्त व्यापार करारांचा जास्तीत जास्त वापर, नवीन बाजारपेठांचा शोध (Market Diversification), मूल्यवर्धन (Value Addition) वाढवणे आणि विभागांमधील समन्वय वाढवणे यांचा समावेश आहे.

हेही वाचा: युद्धविरामाला धक्का! गाझामध्ये इस्रायलचे पुन्हा जोरदार हवाई हल्ले; 81 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये लहान मुलांची संख्या मोठी
 
त्यांनी पुढे सांगितले की, “भारताची निर्यात वाढवण्यासाठी सरकार नवीन कल्पना आणि सुधारणा राबवणार आहे. आमचं लक्ष्य म्हणजे जागतिक बाजारात ‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ या संकल्पनेला गती देणे.”
 
अधिकृत आकडेवारीनुसार, जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या काळातही भारताची निर्यात वाढत आहे. एप्रिल ते सप्टेंबर 2025 या काळात भारताची एकूण निर्यात (वस्तू आणि सेवा मिळून) 413.30 अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे, जी मागील वर्षाच्या याच काळातील 395.71 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक आहे. फक्त सप्टेंबर 2025 महिन्यातील निर्यात 67.20 अब्ज डॉलर्स इतकी होती, म्हणजेच 0.78 टक्के वाढ झाली आहे.
 
या व्यतिरिक्त, पीयूष गोयल यांनी न्यूझीलंडचे व्यापार मंत्री टॉड मॅक्ले यांच्यासोबत एक महत्वाची ऑनलाइन बैठक घेतली. या बैठकीत दोन्ही देशांतील व्यापार संबंध मजबूत करणे आणि मुक्त व्यापार करारावर चर्चा पुढे नेणे यावर भर देण्यात आला.
 
“आमचं उद्दिष्ट म्हणजे दोन्ही देशांच्या फायद्याचं आणि दीर्घकालीन दृष्टीने फायदेशीर असं फ्रेमवर्क तयार करणं. भारत आणि न्यूझीलंड यांच्या भागीदारीमुळे दोन्ही देशांतील व्यापार आणि गुंतवणुकीच्या संधी आणखी वाढतील.” असेही गोयल म्हणाले.

हेही वाचा: Reverse Mortgage: घर विकण्याची अन् भाडेकरूंची झंझट दूर; सरकारची 'ही' योजना घरावर देईल पगारासारखे मासिक उत्पन्न


सम्बन्धित सामग्री