पंतप्रधान मोदींनी व्हिडीओ कॉलवर साधला पायलट कॅप्टन स्मित मच्छार यांच्याशी संवाद; अफाट धैर्याचं केलं भरभरून कौतुक

संवादादरम्यान पंतप्रधान मोदींनी त्यांच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी केली असून, त्यांनी दाखवलेल्या अफाट धैर्याचे आणि संयमाचे भरभरून कौतुक केले. संपूर्ण देश त्यांच्यासाठी प्रार्थना करत असून, ते लवकर पूर्णपणे बरे व्हावेत अशा शुभेच्छाही पंतप्रधानांनी दिल्या.

पंतप्रधान मोदींनी व्हिडीओ कॉलवर साधला पायलट कॅप्टन स्मित मच्छार यांच्याशी संवाद; अफाट धैर्याचं केलं भरभरून कौतुक
पंतप्रधानांनी साधला स्मित मच्छार यांच्याशी संवाद

PM Modi speaks with pilot: दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या ‘फ्लायदुबई’ (Flydubai) विमानातील शेकडो प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या भारताच्या धाडसी पायलट कॅप्टन स्मित मच्छार यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनवरून थेट संवाद साधला आहे. कॉकपिटमध्ये सह-वैमानिकाने केलेल्या जीवघेण्या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी होऊनही, कॅप्टन मच्छार यांनी कमालीचे धैर्य आणि प्रसंगावधान दाखवत विमान सुरक्षितपणे उतरवले. संवादादरम्यान पंतप्रधान मोदींनी त्यांच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी केली असून, त्यांनी दाखवलेल्या अफाट धैर्याचे आणि संयमाचे भरभरून कौतुक केले. संपूर्ण देश त्यांच्यासाठी प्रार्थना करत असून, ते लवकर पूर्णपणे बरे व्हावेत अशा शुभेच्छाही पंतप्रधानांनी दिल्या.

“तुमच्या धैर्यामुळेच अनेक निष्पापांचे प्राण वाचले”

कॅप्टन स्मित यांच्याशी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “तुमचे धैर्य, संयम आणि प्रसंगावधान यामुळेच अत्यंत बिकट परिस्थितीत तुम्ही काही क्षणांत योग्य निर्णय घेऊ शकलात आणि अनेक लोकांचे प्राण वाचवले. आज संपूर्ण देश अभिमानाने सांगू शकतो की, आपण भारतीय जीव घेणारे नाही तर जीव वाचवणारे लोक आहोत.” या भीषण घटनेनंतर कॅप्टन मच्छार यांच्यावर सुरुवातीला सौदी अरेबियातील रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले, त्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी दुबई आणि नंतर अबू धाबी येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

भारतीय राजदूत आणि परराष्ट्र मंत्रालयाकडून विशेष लक्ष

संयुक्त अरब अमिरातीमधील (UAE) भारताचे राजदूत दीपक मित्तल यांनी रुग्णालयात जाऊन कॅप्टन मच्छार आणि त्यांच्या कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेतली. कॅप्टन मच्छार यांची प्रकृती सध्या सुधारत असून, त्यांच्या वैद्यकीय उपचारांची योग्य काळजी घेतली जात असल्याचे दूतावासाने स्पष्ट केले आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालय आणि अबू धाबी येथील दूतावास स्थानिक प्रशासनाच्या सतत संपर्कात असून, त्यांच्या आरोग्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. परराष्ट्र मंत्रालयानेही कॅप्टन मच्छार यांच्या शौर्याला अधिकृत निवेदनाद्वारे सलाम केला आहे.

हेही वाचा – आकाशात कॉकपिटमध्ये नेमकं काय घडलं? फ्लाय दुबईच्या विमानामधील प्लंबरने सांगितला थरार

हवेच विमानात घडला होता थरार

बुधवारी दुबईहून तेल अवीवकडे जाणारे फ्लायदुबईचे विमान FZ1073 अचानक 34,000 फुटांवरून 17,000 फुटांपर्यंत वेगाने खाली आले. विमानातील सह-पायलटने विमान पाडण्याच्या हेतूने कॅप्टन मच्छार यांच्यावर कॉकपिटमध्ये चाकूने हल्ला केला होता. रक्तबंबाळ आणि गंभीर जखमी अवस्थेत असतानाही, कॅप्टन मच्छार यांनी जिद्दीने विमानाचे नियंत्रण हाताळले आणि 27 मुलांसह एकूण 174 प्रवाशांना घेऊन विमान सौदी अरेबियातील तबुक येथील ‘प्रिन्स सुलतान बिन अब्दुलअझीझ विमानतळावर’ सुरक्षितपणे उतरवले. त्यांच्या या अतुलनीय शौर्याचे जगभरातून कौतुक होत आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number