Saturday, June 15, 2024 04:49:06 PM

PM Modi
मोदी ९ जून रोजी तिसऱ्यांदा शपथ घेणार, सूत्रांची माहिती

राओलाचे नेते म्हणून नरेंद्र मोदी हे रविवार ९ जून रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

मोदी ९ जून रोजी तिसऱ्यांदा शपथ घेणार सूत्रांची माहिती

नवी दिल्ली : राओलाचे नेते म्हणून नरेंद्र मोदी हे रविवार ९ जून रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याचे सूत्रांकडून समजते. याआधी ७ किंवा ८ जून रोजी शपथविधी होईल, असे वृत्त येत होते. 

शपथ घेतल्यावर मोदींचा पंतप्रधानपदाचा सलग तिसरा कार्यकाळ सुरू होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शपथविधी रविवारी संध्याकाळी सहा वाजल्यापासून सुरू होणार आहे. याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. 

रालोआच्या बुधवारी झालेल्या बैठकीत नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड करण्यात आली. यानंतर मोदींनी शुक्रवारी ७ जून रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली आहे.

              

सम्बन्धित सामग्री