पंतप्रधान मोदींनी केले महाकुंभात पवित्र स्नान
Edited Image
PM Modi Mahakumbh Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रयागराज महाकुंभात पवित्र संगम नदीत स्नान केले. मंत्रांच्या जपात त्यांनी त्रिवेणी संगमात पवित्र डुबकी घेतली आणि सूर्याला जल अर्पण केले. यासोबतच त्यांनी गंगेचीही पूजा केली. यावेळी पंतप्रधानांसोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उपस्थित होते. पंतप्रधान हेलिकॉप्टरने डीपीएस हेलिपॅडवर पोहोचले आणि तेथून रस्त्याने अरैल येथील व्हीआयपी घाटावर गेले. अरैल घाटावरून ते मोटार बोटीने संगमला पोहोचले, जिथे त्यांनी भगवे कपडे घातले आणि वैदिक मंत्रांचा जप करत संगम नदीत डुबकी मारली.
हेही वाचा - दिल्ली पोलिस भाजपसाठी काम करताय?
पंतप्रधान मोदींचे त्रिवेणी संगमात स्नान -
पंतप्रधानांच्या प्रयागराज दौऱ्यादरम्यान कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. त्याचबरोबर भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याची देखील काळजी घेण्यात आली. पंतप्रधान मोदींनी प्रयागराजमध्ये माता गंगा, माता यमुना आणि माता सरस्वती या पवित्र नद्यांच्या दिव्य प्रवाहांच्या संगमावर पवित्र स्नान केले आणि तीर्थराज प्रयागलाही भेट दिली. यापूर्वी ते 13 डिसेंबर रोजीही येथे आले होते. आतापर्यंत 38 कोटींहून अधिक भाविकांनी संगमात स्नान केले आहे.
हेही वाचा - अरविंद केजरीवाल यांच्या विरुद्धात FRI दाखल; यमुनेच्या पाण्यात विष मिसळल्यासंदर्भात केलं होतं 'हे' विधान
प्रयागराज महाकुंभात भाविकांचा ओघ सुरूच -
प्रयागराज महाकुंभमेळा हा जगातील सर्वात मोठ्या धार्मिक कार्यक्रमांपैकी एक आहे. प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक या देशातील चार प्रमुख ठिकाणी दर बारा वर्षांनी कुंभमेळा आयोजित केला जातो. त्याच वेळी, यंदा प्रयागराज येथे सुरू असलेला महाकुंभमेळा 144 वर्षांतून एकदा आयोजित केला जातो. त्याची तारीख आणि आयोजन वर्ष ज्योतिषशास्त्रीय गणनेच्या आधारे ठरवले जाते. हिंदू धर्मात महाकुंभाला खूप पवित्र मानले जाते. धार्मिक मान्यतांनुसार, महाकुंभमेळ्यात स्नान केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि व्यक्तीला मोक्ष मिळतो. यावेळी, देश-विदेशातून कोट्यवधी भाविक महाकुंभात येत आहेत.
संगम तटावर पोलिस, आणि आरएएफ कर्मचाऱ्यांची तैनात -
पंतप्रधानांच्या कार्यक्रमांभोवती सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी एनएसजीने संपूर्ण परिसर ताब्यात घेतला आहे. यासोबतच, मोठ्या संख्येने पोलिस, पीएसी आणि आरएएफ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. गंगा घाटांवरील सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे. तसेच शहरापासून कुंभ नगरीपर्यंत संशयितांची तपासणी केली जात आहे. यापूर्वी प्रयागराज दौऱ्यात पंतप्रधानांनी 5500 कोटी रुपयांच्या 167 विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले होते. परिणामी, प्रयागराजमध्ये सर्वसामान्यांसाठी कनेक्टिव्हिटी, सुविधा आणि सेवांमध्ये सुधारणा झाली.