PM Modi Instagram Video: PM मोदींच्या ‘त्या’ व्हिडीओने पेटला राजकीय वणवा; क्षमेच्या भाषेवर विरोधकांची जोरदार टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रात्री उशिरा इन्स्टाग्रामवर 'जेन-झेड' म्हणजेच आजच्या तरुण पिढीला उद्देशून एक विशेष व्हिडिओ संदेश जारी केला.

PM Modi Instagram Video: PM मोदींच्या ‘त्या’  व्हिडीओने पेटला राजकीय वणवा; क्षमेच्या भाषेवर विरोधकांची जोरदार टीका

PM Modi Instagram Video: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रात्री उशिरा इन्स्टाग्रामवर 'जेन-झेड' म्हणजेच आजच्या तरुण पिढीला उद्देशून एक विशेष व्हिडिओ संदेश जारी केला. या संदेशात त्यांनी दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या तरुणांचा उल्लेख केला. आंदोलक तरुणांनी त्यांच्याविषयी आणि त्यांच्या आईबद्दल अनुचित शब्दांचा वापर केल्याचे सांगत, या धक्कादायक कृत्यानंतरही आपण त्या भरकटलेल्या तरुणांना क्षमा करण्यास तयार असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. युवकांना शिक्षेऐवजी प्रेमाने जवळ करून योग्य दिशा दाखवण्याची ही वेळ असल्याचे ते म्हणाले. मात्र, पंतप्रधानांच्या या वक्तव्यानंतर देशाच्या राजकीय वर्तुळात नवा वाद उफाळून आला आहे.

आम आदमी पक्षाचा सडेतोड पलटवार आणि काँग्रेसची टीका
पंतप्रधानांच्या या क्षमाशील भूमिकेवर विरोधी पक्षांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वरून केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. कोणत्याही व्यक्तीच्या आईबद्दल अपशब्द वापरणे चुकीचेच आहे, हे मान्य करत त्यांनी भाजप नेत्यांच्या भूतकाळातील वक्तव्यांची आठवण करून दिली. भाजपचे प्रमुख नेते वारंवार राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांबद्दल अयोग्य भाषा वापरतात, असा गंभीर आरोप त्यांनी केला. स्वतःच्या पक्षातील नेत्यांच्या भाषेवर नियंत्रण नसताना पंतप्रधान केवळ आंदोलक तरुणांवर निशाणा साधत असल्याचा टोला त्यांनी लगावला. काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनीही या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले आहे.

हेही वाचा – Print Newspaper Update: मोठा निर्णय! वृत्तपत्र खरेदीतील ई-पेपरची सक्ती रद्द; सरकारचा 24 तासांत यू-टर्न

सत्ताधारी गोटातून समर्थनाचा सुर आणि पंतप्रधानांचे कौतुक
दुसरीकडे, सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी पंतप्रधानांच्या या भूमिकेचे जोरदार समर्थन केले आहे. केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी पंतप्रधानांचा हा संदेश अत्यंत संवेदनशील आणि मार्गदर्शक असल्याचे म्हटले. तर, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी पंतप्रधानांच्या क्षमाशील वृत्तीची प्रशंसा करताना सांगितले की, वयाने लहान असलेल्या तरुणांकडून चुका होणे स्वाभाविक आहे. मात्र, त्यांना कठोर शिक्षा देण्याऐवजी संयमाने आणि प्रेमाने योग्य रस्ता दाखवणे हेच एका मोठ्या नेत्याचे लक्षण असते. पंतप्रधानांच्या या भूमिकेमुळे तरुणांना आपली चूक उमजेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number