नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यापासून 5 देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांचा दौरा 2 जुलैपासून सुरू होऊ शकतो. पाच देशांचा हा दौरा खूप महत्त्वाचा आहे. यामध्ये ते प्रथम 6 आणि 7 जुलै रोजी ब्राझीलमधील रिओ डी जानेरो येथे होणाऱ्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होतील. या शिखर परिषदेदरम्यान, पंतप्रधान मोदी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरुद्ध उर्वरित ब्रिक्स सदस्य देशांचा पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न करतील. ब्राझील व्यतिरिक्त, नरेंद्र मोदी त्रिनिदाद आणि टोबॅगो, अर्जेंटिना, घाना आणि नामिबियालाही भेट देऊ शकतात. तथापी, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग ब्राझीलमध्ये होणाऱ्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होणार नाहीत.
हेही वाचा - आजपासून फोनवर नाही ऐकू येणार अमिताभ यांचा आवाज; कारण समजताच व्हाल आश्चर्य
दरम्यान, ब्रिक्स शिखर परिषदेनंतर, ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी स्टेट डिनरला उपस्थित राहतील. दा सिल्वा यांनी त्यांना यासाठी खास आमंत्रित केले आहे. असे म्हटले जात आहे की, शी जिनपिंग यामुळे खूप निराश झाले आहेत.
हेही वाचा - विंग कमांडर अभिनंदन यांना पकडणारा पाकिस्तानी अधिकारी तालिबानच्या चकमकीत ठार
पंतप्रधान मोदी 5 देशांच्या दौऱ्यावर -
ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाच देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. नरेंद्र मोदी ग्लोबल साउथच्या सर्व मोठ्या देशांच्या प्रमुखांशी संवाद साधून पाकिस्तानला वेगळे करू इच्छितात. जगात पंतप्रधान मोदींची प्रतिष्ठा सतत वाढत आहे. यासाठी एक नवीन सर्वेक्षण समोर आले आहे. यामध्ये, नरेंद्र मोदी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्यापेक्षा खूप पुढे आहेत.