Wednesday, November 19, 2025 02:05:10 PM

Pradhan Mantri Dhan Dhanya Krishi Yojana : प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजनेतून शेतकऱ्यांसाठी 24 हजार कोटींचा निधी होणार खर्च; राज्यातील 'या' जिल्ह्यांचा समावेश

तप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीत 'प्रधानमंत्री धन-धान्य कृषि योजना' या कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहेत.

pradhan mantri dhan dhanya krishi yojana  प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजनेतून शेतकऱ्यांसाठी 24 हजार कोटींचा निधी होणार खर्च राज्यातील या जिल्ह्यांचा समावेश

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीत 'प्रधानमंत्री धन-धान्य कृषि योजना' या कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहेत. यादरम्यान, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज गिंह चौहान यांनी माहिती दिली की, 'भारत देश गहू आणि तांदूळ उत्पादनात आत्मनिर्भर आहे. मात्र, आता फक्त गहू आणि तांदूळ उत्पादनात भारत देश आत्मनिर्भर नाही होणार, तर कडधान्य उत्पादनातही आपला भारत देश अत्मनिर्भर बनेल. यासोबतच, लवकरच देशात कडधान्य शेतीचे उत्पादन वाढवले जाईल'. 'शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी, कृषि क्षेत्र अधिक कणखर बनव्यासाठी ही योजना राबवली जात आहे'. 

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली 11 ऑक्टोबर रोजी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक सभागृह, पुणे येथे पार पडणार आहे. यादरम्यान, दत्तात्रय भरणे म्हणाले की, 'या कार्यक्रमात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा'. शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी तसेच, त्यांच्या हितासाठी प्रधानमंत्री धन-धान्य कृषि योजना जाहीर केली आहे. केंद्र सरकारने देशातील 100 जिल्हे निवडले आहेत, जिथे उत्पादकता कमी आहे, सिंचन क्षमता कमी आहे आणि कृषी कर्ज मिळण्यास अडचणी येत आहेत. 

हेही वाचा: Babasaheb Patil on Loan Waiver : 'लोकांना कर्जमाफीचा नाद लागलेला आहे...', अजित पवारांच्या नेत्याचं बळीराजाबद्दल बेताल वक्तव्य

केंद्र सरकारने महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांना समाविष्ट केला आहे

पालघर, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, धुळे, रायगड आणि बीड जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. 

'ही' योजना किती वर्षांसाठी राबवली जाणार आहे?

ही योजना 6 वर्षांसाठी राबवली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रधानमंत्री धन-धान्य कृषि योजनेसाठी दरवर्षी 24 हजार कोटींचा निधी खर्च करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या योजनेमुळे, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 


सम्बन्धित सामग्री