Mann Ki Baat: पंतप्रधान मोदींचा ‘मन की बात’मधून देशवासीयांना संवाद; दहशतवादाविरुद्ध भूमिका अन् विविध प्रेरणादायी उपक्रमांवर टाकला प्रकाश

आजचा भारत दहशतवाद अजिबात खपवून घेत नाही, असे सांगत पंतप्रधानांनी भारताच्या धोरणात्मक भूमिकेवर भर दिला.
Mann Ki Baat
'भारत दहशतवाद खपवून घेत नाही'; मन की बातमध्ये मोदी नेमकं काय म्हणाले?

Mann Ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकप्रिय रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’च्या 138 व्या भागाद्वारे देशवासीयांना संबोधित केले. यावेळी त्यांनी सर्जिकल स्ट्राईकला 10 वर्षे पूर्ण झाल्याचे विशेषत्वाने नमूद केले. आजचा भारत दहशतवाद अजिबात खपवून घेत नाही, असे सांगत पंतप्रधानांनी भारताच्या धोरणात्मक भूमिकेवर भर दिला. ते म्हणाले की, 10 वर्षांपूर्वी, 28-29 सप्टेंबर 2016 रोजी, भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर यशस्वी सर्जिकल स्ट्राईक केला होता. दहशतवादाविरुद्ध कारवाई करण्यासाठी आपल्या शूर सैनिकांनी ज्या प्रकारे नियंत्रण रेषा ओलांडली, ते पाहून संपूर्ण जग थक्क झाले होते. दहशतवादी हल्ल्यांमुळे भारताला दीर्घकाळ ज्या वेदना सहन कराव्या लागल्या होत्या, त्याला सर्जिकल स्ट्राईक हे आमचे अत्यंत निर्णायक प्रत्युत्तर होते.

अशोक सिंघलजींना श्रद्धांजली आणि मोढेरा सूर्य मंदिराचा गौरव

‘मन की बात’मध्ये पंतप्रधान मोदींनी आदरणीय दिवंगत अशोक सिंघलजी यांची आठवण काढत त्यांना आदरांजली अर्पण केली. अशोक सिंघलजी यांचा जन्म 27 सप्टेंबर 1926 रोजी आग्रा येथे झाला होता, आणि त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांनी समाजकार्यातील योगदानाचे स्मरण केले. अशोक सिंघलजींनी समाजात राहून एका तपस्वीसारखे जीवन जगत राम जन्मभूमी आंदोलनाला नवी दिशा व ऊर्जा दिल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, 1026 ईसवी सनमध्ये गझनीच्या आक्रमणात नष्ट झालेल्या आणि राजा भीमदेव यांनी 1025 ईसवी सनमध्ये बांधलेल्या मोढेरा सूर्य मंदिराच्या विनाशाला या वर्षी 1,000 वर्षे पूर्ण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. आज मोढेराने ऐतिहासिक वारशासोबतच देशातील पहिले ‘सौर गाव’ म्हणूनही जागतिक स्तरावर नवी ओळख निर्माण केली आहे.

हेही वाचा –CJP Protest : CJP ची मोठी घोषणा! 2 ऑक्टोबरपासून मुंबईत आंदोलनाचा दिला इशारा, मागणी फक्त एकच…

देशातील विविध प्रेरणादायी उपक्रम आणि महिला सक्षमीकरण

या संभाषणात पंतप्रधानांनी देशाच्या विविध भागांत सुरू असलेल्या सामाजिक आणि पर्यावरणीय बदलांचा आढावा घेतला. तिरुचिरापल्ली येथील मनाप्पराई आणि आसाममधील निसर्ग संवर्धनाच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. सुंदरबनमधील झारखाली भागातील महिलांच्या उल्लेखनीय कार्याचा विशेष उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, वाघांच्या हल्ल्यात पती गमावलेल्या या महिला खारफुटीची (मँग्रोव्ह) जंगले फुलवत आहेत. ही झाडे गावांच्या संरक्षणासाठी नैसर्गिक कवच बनली असून महिलांना हक्काचे उत्पन्नाचे साधनही मिळवून देत आहेत. याशिवाय, ‘नशा मुक्त युवा अभियान’, गावांमधील हॉकी प्रतिभा शोधण्यासाठी राजिंदर सिंग यांचे प्रयत्न, तसेच प्रतापगडमध्ये आवळा प्रक्रियेतून ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ (ODOP) योजनेअंतर्गत महिला स्वयं-सहायता गटांना मिळणाऱ्या आर्थिक समृद्धीवरही त्यांनी प्रकाश टाकला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version