देशभर पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय स्थिती? हवामानाचा महत्त्वाचा अपडेट

ऑक्टोबर हिटची तीव्रता आणि मान्सून परतीच्या पावसाने दडी मारल्यामुळे राज्यभरात उन्हाचे चटके जाणवत आहेत.
देशभर पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय स्थिती? हवामानाचा महत्त्वाचा अपडेट

ऑक्टोबर हिटची तीव्रता आणि मान्सून परतीच्या पावसाने दडी मारल्यामुळे राज्यभरात उन्हाचे चटके जाणवत आहेत. ऑक्टोबरमध्ये उन्हाळा ऋतू सुरू आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. मात्र शेजारील राज्यातील काही भागांत वादळी वाऱ्यासह तर काही ठिकाणी मुसळधार व तुरळक सरी बरसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भारतीय हवामान विभागाने दिल्ली, उत्तर प्रदेशसह 23 राज्यांत पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, महाराष्ट्रातून नैऋत्य मान्सूनने माघार घेतल्याचे जाहीर केले आहे. काही भागांत वाऱ्याचा वेग ताशी 70 किलोमीटरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. दरम्यान, नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी गुरुवारी संपूर्ण महाराष्ट्रातून माघार घेतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.

देशातल्या कोणत्या 23 राज्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पाऊस?

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, जम्मू-काश्मीर, पश्चिम बंगाल, केरळ, पंजाब, झारखंड, ओडिशा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, सिक्कीम, आसाम, त्रिपुरा, तमिळनाडू, छत्तीसगड, मिझोराम, मणिपूर आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये पाऊस आणि वादळी हवामानाची शक्यता आहे. काही भागांत जोरदार वारे वाहण्यासह मेघगर्जना होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी स्थानिक हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

हेही वाचा -’10 ऑक्टोबरच्या जंतर-मंतर आंदोलनात सहभागी व्हा…’; अरविंद केजरीवाल यांचे देशभरातील नागरिकांना आवाहन

राज्यातून मान्सूनची एक्झिट, IMD ची अधिकृत घोषणा

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मान्सूनने गुरुवारी, 8 ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रातून काढता पाय घेतला आहे. मान्सूनच्या परतीसाठी अनुकूल वातावरण तयार झाल्यामुळे आता देशाच्या उर्वरित भागातूनही लवकरच मान्सून माघार घेईल. यंदाच्या वर्षी 19 सप्टेंबरला पश्चिम राजस्थानातून मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला होता. 3 ऑक्टोबरपर्यंत उत्तर भारत, संपूर्ण गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांतून तो निघून गेला होता. आता गुरुवारी गोवा, कर्नाटकचा काही भाग, झारखंड आणि छत्तीसगडसह संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सूनने माघार घेतली आहे.

मान्सूनच्या परतीची सीमा कुठपर्यंत?

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या मान्सूनच्या परतीची सीमा सुपौल, रांची, सुंदरगड, बारगड, विजापूर, हैदराबाद, बेळगाव आणि पणजीपर्यंत पोहोचली आहे. दक्षिण भारतातील आणखी काही भागांतून मान्सून माघारी फिरण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version