Building Collapse In Shimla: हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथून धक्कादायक बातमी समोर येत आहे. येथे एक पाच मजली घर पत्त्याच्या घराप्रमाणे कोसळले. सोमवारी सकाळी शिमला येथील भट्टाकुफर भागात ही दुर्घटना घडली. निसर्गाच्या प्रकोपाने काही क्षणातच 5 मजली इमारत जमीनदोस्त झाली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या मते, काही वेळातच पाण्याचा प्रवाह इतका जोरदार झाला की डोंगराच्या उतारावर बांधलेली ही इमारत काही क्षणातच कोसळली. काही सेकंदातच संपूर्ण इमारत जमीनदोस्त झाली. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, जो पाहून सर्वांनाचं धक्का बसला आहे. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की इमारत प्रथम हादरते आणि नंतर पत्त्यांच्या घरासारखी कोसळते. व्हिडिओमध्ये राज निवास नावाची इमारत काही सेकंदातच उद्ध्वस्त होत असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा - Boeing-737 विमान अपघातातून थोडक्यात बचावले; लँडिंग करताना विमान धावपट्टीवर एका बाजूला झुकले, पहा व्हिडिओ
सुदैवाने, इमारत कोसळण्यापूर्वी जवळच्या लोकांना धोक्याची जाणीव होती. त्यामुळे कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही. तथापि, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तथापी, पावसाळ्यात अशा घटना घडल्याने लोकांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच प्रशासनाने लोकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि असुरक्षित इमारतींपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा - ऐकावं ते नवलचं! न्यायालयाच्या व्हर्च्युअल सुनावणीला पठ्ठ्याने चक्क टॉयलेट सीटवर बसून लावली हजेरी; व्हिडिओ व्हायरल
घराच्या मालकीण अंजना वर्मा यांनी सांगितले की, धोका लक्षात घेऊन इमारत वेळेवर रिकामी करण्यात आली होती. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. जवळच सुरू असलेल्या चार पदरी बांधकामामुळे इमारत धोक्यात आली होती. त्यामुळे काही काळापासून ती रिकामी होती. दरम्यान, इमारत कोसळल्यानंतर स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाला याबाबत माहिती दिली. सध्या घटनास्थळी ढिगारा साफ करण्याचे काम सुरू आहे.