Saturday, June 14, 2025 03:14:18 AM

पाकव्याप्त काश्मीरवरचा ताबा सोडा - परराष्ट्र मंत्रालय

पाकव्याप्त काश्मीरवरचा ताबा सोडा असा इशारा परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला दिला आहे. भारत आणि पाकिस्तान शस्त्रसंधीनंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने तिसऱ्यांदा पत्रकार परिषद घेतली.

पाकव्याप्त काश्मीरवरचा ताबा सोडा - परराष्ट्र मंत्रालय

नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरवरचा ताबा सोडा असा इशारा परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला दिला आहे. भारत आणि पाकिस्तान शस्त्रसंधीनंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने तिसऱ्यांदा पत्रकार परिषद घेतली. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रकारांना संबोधित करताना भारताचे पीओकेबद्दलचे धोरण स्पष्ट केले आहे. 
पाकव्याप्त काश्मीरवर पाकचा अवैध कब्ज आहे. काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी चालणार नाही. पाकव्याप्त काश्मीरवरचा ताबा सोडा असा इशारा परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल दिला आहे. अनेक वर्षांपासून पाकिस्तानने दहशतवादाला खतपाणी घातलं. पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी टीआरएफने घेतली होती. त्यामुळे टीआरएफला दहशतवादी संघटनांच्या यादीत टाकावं अशा मागणी भारताने केली आहे. दहशतवादाचा सिंधू करारावर परिणाम झाला आहे. दरम्यान पाकिस्तानकडून हल्ला झाल्यास भारतही प्रत्युत्तर देणार असे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. 

हेही वाचा : काश्मीरच्या कानाकोपऱ्यात पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचे पोस्टर; शोधणाऱ्याला 20 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारत आणि अमेरिकेत चर्चा झाली होती. 9 मे पर्यंत पाकिस्तान मोठ्या हल्ल्याच्या धमकीची भाषा करत होता. कांगावा करण्याची पाकची जुनीच खोड आहे. सिंधू करार स्थगितच राहणार असं भारतानं ठणकावलं आहे. पाक दहशतवाद्यांचं समर्थन करणार तोपर्यंत सिंधू करार स्थगित राहणार आहे. तसेच पाकिस्तानकडून हल्ला झाल्यास भारतही प्रत्युत्तर देणार असेही जयस्वाल यांनी म्हटले. 

पाकिस्तानच्या गोळीचं उत्तर गोळीनेच देणार आहे. भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानचे अड्डे उद्धवस्त झाले आहेत. हरल्यानंतरही पाकिस्तानकडून जल्लोष सुरू आहे. कुणाचीही मध्यस्थी आम्हाला मान्य नाही. ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचे अतोनात नुकसान झाले आहे. भारताने इशारा देऊनही पाक ऐकला नाही असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. बांग्लादेशमध्ये लवकरात लवकर निष्पक्ष निवडणुका व्हाव्यात. दहशतवाद्यांचे पाकसोबत असल्याचे पुरावे आहेत. पहलगाम हल्ल्यातील पुराव्याबाबत लवकरात लवकर कळवू अणुबॉम्बची धमकी सहन केली जाणार नाही अशी भूमिका परराष्ट्र मंत्रालयाने घेतली आहे. पुढे बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे रणधीर जयस्वाल म्हणाले, एलओसीवर 15-20 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. मोदी आणि अमेरिकेतील उपराष्ट्राध्यक्षांमध्ये चर्चा झाली होती. मात्र भारत आणि अमेरिकेतील चर्चेत व्यापाराचा मुद्दा नव्हता असेही जयस्वाल यांनी सांगितले आहे. 


सम्बन्धित सामग्री