Sadhguru Shares Update On Nepal Flood: नेपाळमध्ये पुराचं रौद्ररूप! शहराचा मोठा भाग वाहून गेला; सद्गुरूंनी सांगितली नेपाळमधील भयावह परिस्थिती

नेपाळ-तिबेट सीमेवरील भीषण पुरानंतर सद्गुरूंनी परिस्थितीबाबत माहिती दिली.

Sadhguru Shares Update On Nepal Flood: नेपाळमध्ये पुराचं रौद्ररूप! शहराचा मोठा भाग वाहून गेला; सद्गुरूंनी सांगितली नेपाळमधील भयावह परिस्थिती

अत्यंत दुःख आणि खेदाने मला हे सांगावे लागत आहे की, तिबेट आणि नेपाळच्या सीमेवर तसेच नेपाळच्या बाजूला अचानक आलेल्या पुराची एक भयंकर घटना घडली आहे. भारतीय बातम्यांनुसार, नेपाळचे सुमारे ४८४ लोक बेपत्ता झाले आहेत; मात्र या तिबेटच्या बाजूला आमच्याकडे कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही.

सकाळी मी स्वतः तिथे जाण्यासाठी निघालो होतो, परंतु सर्व फोन बंद आहेत, दूरसंचार यंत्रणा ठप्प झाली आहे आणि रस्ते बंद असल्याने आम्हाला तिथे पोहोचता आले नाही. आमच्या ग्रुपपैकी एक- S3 ग्रुपबद्दल सांगायचे तर, आम्ही त्यांना सागा येथे भेटलो होतो; तसेच आम्ही वर चढत असताना ते खाली येत होते. या गटात अमेरिकेतील २२, कॅनडातील १२, ऑस्ट्रेलियातील ११, युनायटेड किंगडममधील ९, जर्मनीतील ४, फ्रान्समधील ३, नेपाळमधील ३, नेदरलँड्समधील २, न्यूझीलंडमधील २, सिंगापूरमधील २, स्पेनमधील २ आणि फिनलंड, हंगेरी, इस्रायल, लिथुआनिया, फिलीपिन्स, पोर्तुगाल, रशिया व दक्षिण आफ्रिका या देशांतील प्रत्येकी १ अशा एकूण ८० लोकांचा समावेश आहे. यात ३४ पुरुष आणि ४६ महिला सहभागी आहेत, तसेच जवळच्या हॉटेल्समध्ये मुक्काम केलेले काही स्वयंसेवक – तीन स्वयंसेवक आणि एक डॉक्टर यांचाही समावेश आहे. मला वाटते की, हे डॉक्टर एक दिवसापूर्वीच आश्रमातून तिथे पोहोचले होते. 

परंतु, आमच्याकडे अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी नाही. तरीही, विनाशाची व्याप्ती पाहता परिस्थिती गंभीर वाटते. ज्या इमारतीत आम्ही अवघ्या एका आठवड्यापूर्वी इमिग्रेशनच्या कामासाठी होतो, ती संपूर्ण इमारतच वाहून गेली आहे आणि शहराचा काही भाग देखील वाहून गेला आहे. इतर लोकांच्या संख्येबद्दल आम्हाला अजून काहीही माहिती नाही. सर्व संपर्क यंत्रणा बंद असल्याने आमच्याकडे माहिती मिळवण्याचा कोणताही मार्ग उरलेला नाही.
आम्ही तातडीने भारत आणि नेपाळमधील संबंधित देशांच्या दूतावासांना याबद्दल माहिती दिली आणि आम्ही या प्रक्रियेत सक्रिय आहोत, पण सध्या तरी फार काही करता येण्यासारखी स्थिती नाही. 

सकाळी ९:०५ वाजता आम्हाला गटाचे प्रमुख, ईशांगा प्रवीण यांच्याकडून एक संदेश मिळाला. ९:०५ वाजता त्यांनी संदेश पाठवून कळवले की, ते इमिग्रेशनच्या ठिकाणी पोहोचले आहेत. त्यानंतर, ९:१४ वाजता ही घटना घडली. प्रवीण आमच्या या टीमचे नेतृत्व करत होते आणि दोन दशकांहून अधिक काळापासून आमच्यासोबत पूर्णवेळ ईशांगा म्हणून कार्यरत आहे, त्याच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात आलीः जर त्यांनी सीमा ओलांडली असती, तर त्यांचा नेपाळमधील फोन सक्रिय व्हायला हवा होता, पण तसे निदर्शनास आले नाही. तो गट त्या इमारतीतच होता.

ही एक अत्यंत भयानक आणि असाधारण घटना आहे. आमच्याकडे नेमकी आकडेवारी उपलब्ध नाही, पण एकूण संख्या १५०० च्या वर असू शकते. अनेक नेपाळी गाईड्स आणि त्यांची कुटुंबे आमच्यासोबत होती; त्यापैकी नेमके किती जण होते हे आम्हाला अजून माहित नाही. तिकडच्या बाजूला ४८४ जण असल्याची माहिती मिळत आहे, पण या बाजूची काहीच माहिती उपलब्ध नाही. आम्ही ज्या शहरात प्रवेश केला, त्यातील जवळपास अर्धे शहर दरीच्या भागात वसलेले आहे. असे सांगितले जात आहे की, एखादे सरोवर किंवा नदीचे पात्र फुटले; आणि उद्या सकाळी त्याच वेळी आम्ही तिथे असणार होतो. तर, सध्या ही परिस्थिती आहे.

आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न करत आहोत. आम्ही भारतीय दूतावास आणि भारतातील चिनी दूतावासाद्वारे परवानगी मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत; तसेच अमेरिकन दूतावासही यावर काम करत आहे. मला आणि काही लोकांच्या गटाला तिथे जाण्याची आणि परिस्थितीचा आढावा घेऊन काही मदत करता ww येईल का, हे पाहण्याचा आमचा प्रयत्न आहे. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर साधारण नऊ वाजल्यापासून, आता जवळपास बारा तास झाले आहेत आम्ही अर्ध्या तासापूर्वीच सर्व कुटुंबांना संदेश पाठवले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number