SBI ATM Charges: बँक संपाच्या पार्श्वभूमीवर SBI चा मोठा निर्णय; ATM शुल्काबाबत दिली ‘ही’ महत्त्वाची अपडेट

बँकिंग क्षेत्रातील 90 टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 'युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स' (UFBU) या संघटनेने या संपाची हाक दिली आहे.
SBI ATM charges
SBI ग्राहकांना मोठा दिलासा, ATM शुल्काबाबत मोठी अपडेट

SBI ATM Charges: बँक कर्मचाऱ्यांच्या संभाव्य संपकाळात ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. बँक कर्मचारी 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत संपावर जाण्याची शक्यता आहे. बँकिंग क्षेत्रातील 90 टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’ (UFBU) या संघटनेने या संपाची हाक दिली आहे. दरम्यान, देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीसाठी एटीएम (ATM) व्यवहारांवरील सर्व शुल्क माफ केले आहेत.

शाखा सुरू राहणार आणि एटीएम शुल्क माफ

SBI ने स्पष्ट केले आहे की, प्रस्तावित तीन दिवसांच्या बँक संपकाळात त्यांच्या देशभरातील सर्व शाखा नियमितपणे सुरू राहतील. सरकारने सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना (PSBs) आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांना (RRBs) रविवार, 27 सप्टेंबर रोजी कामकाज सुरू ठेवण्याचे निर्देश दिले होते. मात्र, बँक कर्मचारी संघटनांनी आपला तीन दिवसांचा संप कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असून, कर्मचाऱ्यांना रविवारी कामावर न येण्याचे आवाहन केले आहे. ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वरील एका अधिकृत पोस्टद्वारे SBI ने जाहीर केले की, 28 ते 30 सप्टेंबर या संपकाळात देशभरातील कोणत्याही बँकेच्या एटीएमवर केल्या जाणाऱ्या वित्तीय व अ-वित्तीय व्यवहारांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. यामुळे ग्राहक या तीन दिवसांत शुल्काची कोणतीही चिंता न करता रोख रकमेच्या गरजांसाठी एटीएमचा विनासायास वापर करू शकतात.

हेही वाचा – Gold Price & Demand Trend: गेल्या वर्षभरात सोन्याच्या दरात 60 टक्क्यांनी वाढ; सणासुदीच्या तोंडावर मोठी अपडेट समोर

ग्राहकांसाठी बँकेचा महत्त्वाचा सल्ला

जरी एटीएम शुल्क माफ करण्यात आले असले, तरी ग्राहकांनी सुरक्षेच्या दृष्टीने आणि सोयीसाठी आपल्या बँकेच्या विशिष्ट अटी व शर्ती तपासून घ्याव्यात. SBI ने आपल्या ग्राहकांना सल्ला दिला आहे की, त्यांनी संभाव्य संपकाळात येणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी संपापूर्वीच शाखेशी संबंधित आवश्यक ते सर्व बँक व्यवहार पूर्ण करून घ्यावेत. तसेच, बँकिंग सेवा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी शक्य असेल तिथे डिजिटल बँकिंग आणि स्वयं-सेवा पर्यायांचा जास्तीत जास्त वापर करावा, जेणेकरून संपकाळात कोणत्याही प्रकारच्या गैरसोयीचा सामना करावा लागणार नाही.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version