Indian Stock Market: शेअर बाजारात चढउतार! निफ्टी 25900वर स्थिर, सेन्सेक्समध्ये मोठी हालचाल

कच्च्या तेलातील घसरण, अमेरिकेतील आर्थिक संकेत आणि आयपीओ बाजारातील सकारात्मक प्रतिसाद यामुळे गुंतवणूकदारांची भूमिका संतुलित राहिली.

Indian Stock Market: शेअर बाजारात चढउतार! निफ्टी 25900वर स्थिर, सेन्सेक्समध्ये मोठी हालचाल

मुंबई: जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर बुधवार, 17 डिसेंबर रोजी भारतीय शेअर बाजाराने सावध आणि स्थिर सुरुवात केली. सुरुवातीच्या व्यवहारात गुंतवणूकदारांमध्ये फारसा उत्साह किंवा भीती दिसून आली नाही. आंतरराष्ट्रीय घडामोडी, कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकेतील आर्थिक संकेतांचा बाजारावर स्पष्ट प्रभाव जाणवला.

शेअर मार्केटच्या सुरुवातीला सेन्सेक्स (Sensex) सुमारे 140 अंकांच्या वाढीसह 84,821 पातळीवर पोहोचला, तर निफ्टी (Nifty) जवळपास 51 अंकांची वाढ नोंदवत 25,914 च्या आसपास व्यवहार करताना दिसला. मात्र ही वाढ मर्यादित राहिली आणि दिवसभर बाजारात सुस्तीचे वातावरण होते. निफ्टीचा 25,850 च्या वर टिकून राहणे सध्या गुंतवणूकदारांसाठी दिलासादायक मानले जात आहे.

हेही वाचा: IPL Inspiring Story: आई फुले विकायची, वडील मैदान सांभाळायचे; आज मुलगा आयपीएलचा स्टार

आजच्या व्यवहारात भारतासंदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी दिलेले विधान महत्त्वाचा घटक ठरले. ट्रम्प यांनी भारताला अमेरिकेचा महत्त्वाचा भागीदार म्हटले असून, त्यामुळे शेअर बाजाराला मानसिक आधार मिळण्याची शक्यता आहे. मात्र गिफ्ट निफ्टी (Gift Nifty) जवळपास कमीच राहिला, तसेच आशियाई बाजारांकडूनही कोणतेही ठोस सकारात्मक संकेत मिळाले नाहीत.

दरम्यान, अमेरिकेत कमकुवत जॉब डेटा (Job Data) समोर आल्यामुळे डाओ जोन्स (Dow Jones) सुमारे 300 अंकांनी घसरला. मात्र टेस्ला (Tesla) शेअर्समधील तेजीमुळे नॅस्डॅक (Nasdaq) निर्देशांकात किरकोळ वाढ नोंदवली गेली. कमोडिटी बाजारात रशिया-युक्रेन (Russia-Ukraine) यांच्यात संभाव्य शांतता कराराच्या चर्चांमुळे कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतींमध्ये मोठी घसरण झाली. ब्रेंट क्रूड (Brent Crude) 59 डॉलर प्रति बॅरलच्या खाली घसरले असून, हा जवळपास पाच वर्षांतील नीचांकी स्तर मानला जात आहे.

याउलट सुरक्षित गुंतवणूक मानल्या जाणाऱ्या सोन्यामध्ये (Gold) तेजी दिसून आली असून कॉमेक्स गोल्ड (Comex Gold) सुमारे 4,350 डॉलर पातळीवर पोहोचले आहे. दरम्यान, प्रायमरी मार्केट (Primary Market) मध्ये IPO बाबत गुंतवणूकदारांची उत्सुकता कायम आहे. नेफ्रोकेअर हेल्थ सर्व्हिसेस (Nephrocare Health Services) आणि पार्क मेडी वर्ल्ड (Park Medi World) यांच्या आयपीओला चांगला प्रतिसाद मिळत असून, विशेषतः QIB आणि NII श्रेणीत जोरदार सब्सक्रिप्शन नोंदवले गेले आहे. हे चित्र सध्याच्या बाजारासाठी सकारात्मक संकेत मानले जात आहेत.

हेही वाचा: BMC Election : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अंतिम यादी जाहीर! कोणत्या प्रभागात सर्वाधिक आणि कमी मतदार?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number