Video : बसच्या ऑटोमॅटिक दरवाजात मान अडकून 7 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी अंत; 15 मिनिटांचे CCTV फुटेज गायब झाल्याने संशय बळावला

या दुर्घटनेनंतर समोर आलेल्या सीसीटीव्ही (CCTV) फुटेजमध्ये दिव्येशची मान बसच्या पुढील ऑटोमॅटिक दरवाजात अडकलेली दिसत आहे.

Video : बसच्या ऑटोमॅटिक दरवाजात मान अडकून 7 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी अंत; 15 मिनिटांचे CCTV फुटेज गायब झाल्याने संशय बळावला

Bus Automatic Door Accident: गुजरातमधील वडोदरा शहरातील सूर्यनगर-तरसाली बायपासवर 20 ऑगस्ट रोजी एका 7 वर्षांच्या निष्पाप बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. मृत मुलाचे नाव दिव्येश राठवा असून तो इयत्ता दुसरीचा विद्यार्थी होता. दुपारी सुमारे 12:30 वाजता शाळेतून घरी परतलेला दिव्येश प्रसाद आणण्यासाठी बाहेर पडला होता. काही वेळाने एका ऑटोमोबाईल वर्कशॉपमध्ये उभ्या असलेल्या बसच्या ऑटोमॅटिक दरवाजात त्याची मान अडकलेल्या स्थितीत तो आढळला. कुटुंबीयांनी त्याला तात्काळ रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

घटनास्थळावरील 15 मिनिटांचे सीसीटीव्ही रेकॉर्डिंग गायब
या दुर्घटनेनंतर समोर आलेल्या सीसीटीव्ही (CCTV) फुटेजमध्ये दिव्येशची मान बसच्या पुढील ऑटोमॅटिक दरवाजात अडकलेली दिसत आहे. काही नागरिकांनी दरवाजा उघडून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. दरवाजा थोडा उघडल्यानंतर मुलाचे शरीर खाली पडताना फुटेजमध्ये दिसते. मात्र, घटना घडण्यापूर्वीचे साधारण 15 मिनिटांचे महत्त्वाचे फुटेज सीसीटीव्ही रेकॉर्डमधून गायब असल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, उपलब्ध सीसीटीव्हीच्या आधीच्या भागात चालक बसचा दरवाजा बंद करून बाहेर जाताना दिसतो. त्यानंतरच्या फुटेजमध्ये मुलगा दरवाजात अडकलेल्या अवस्थेत दिसतो. यामधल्या वेळेचं सीसीटीव्ही फुटेज मात्र गायब आहे. त्या काळात परिसरात वीजपुरवठा खंडित झाला होता की तांत्रिक फुटेज जाणीवपूर्वक हटवण्यात आले, या दृष्टीने पोलीस उपायुक्त अभिषेक गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

हेही वाचा – Teacher Slaps Student: शिक्षिकेने कानशिलात लगावताचं धाडकन कोसळला 6 वर्षांचा चिमुरडा; मृत्यूचा थरार CCTV मध्ये कैद

ऑटोमॅटिक हायड्रॉलिक दरवाजा बंद असताना कसा उघडला?
चालक बसचा दरवाजा बंद करून चहा पिण्यासाठी बाहेर गेला असताना ही घटना घडली. अशा स्थितीत लहान मुलाने दाबल्यामुळे हायड्रॉलिक ऑटोमॅटिक दरवाजा उघडू शकतो का, याची चाचणी करण्यासाठी फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या पथकाला तपास करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. दिव्येश त्या वर्कशॉपपर्यंत कसा पोहोचला, तो बसजवळ काय करत होता आणि बंद असलेला दरवाजा अचानक कसा उघडला, यामागील मूळ तांत्रिक कारणाचा शोध घेतला जात आहे.

राठवा कुटुंबावर शोककळा; पोलिसांकडून गुन्हा दाखल
दिव्येशचे वडील राकेश राठवा हे मूळचे छोटा उदेपूर जिल्ह्यातील पावी जेतपूर येथील असून वडोदऱ्यात एका खासगी बायोगॅस कंपनीत काम करतात. या प्रकरणी कपोराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. लहान मुलाच्या अशा पद्धतीने अचानक जाण्यामुळे राठवा कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हेही वाचा – Lift Accident: भीषण अपघात! लिफ्टमधून बाहेर पडताना तांत्रिक बिघाड, 50 वर्षीय महिलेचा करुण अंत

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number