IPL 2026 Schedule Update: IPL वर युद्धाचे सावट! गॅस टंचाईमुळे स्पर्धा रद्द होणार? मोठी अपडेट समोर

अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे जागतिक स्तरावर इंधनाचा तुटवडा निर्माण झाला असून, त्याचा थेट परिणाम भारताच्या इंधन पुरवठ्यावर झाला आहे.

IPL 2026 Schedule Update: IPL वर युद्धाचे सावट! गॅस टंचाईमुळे स्पर्धा रद्द होणार? मोठी अपडेट समोर

IPL Schedule Update: आखाती देशांमध्ये भडकलेल्या युद्धाचे भीषण पडसाद आता क्रीडा क्षेत्रावर, विशेषतः क्रिकेटच्या मैदानावर उमटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे जागतिक स्तरावर इंधनाचा तुटवडा निर्माण झाला असून, त्याचा थेट परिणाम भारताच्या इंधन पुरवठ्यावर झाला आहे. या अस्थिर परिस्थितीमुळे आगामी IPL 2026 च्या आयोजनावर आता टांगती तलवार निर्माण झाली आहे.

घरगुती गॅसला प्राधान्य; व्यावसायिक पुरवठ्यावर गदा
युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेली इंधन टंचाई लक्षात घेता, केंद्र सरकारने पेट्रोलियम मंत्रालयामार्फत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उपलब्ध गॅस पुरवठा प्रामुख्याने घरगुती वापरासाठी (Cooking Gas) राखीव ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सरकारच्या या निर्णयाचा मोठा फटका व्यावसायिक क्षेत्राला बसणार असून, क्रिकेट स्टेडियममधील सेवा आणि संबंधित व्यावसायिक उपक्रमांसाठी लागणाऱ्या गॅस पुरवठ्यात मोठी कपात होण्याची चिन्हे आहेत.

वेळापत्रकात होणार मोठे बदल?
गॅस टंचाई आणि जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर, आयपीएलच्या नियोजित वेळापत्रकात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बीसीसीआय (BCCI) परिस्थितीचा आढावा घेऊनच पुढचे पाऊल उचलणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बीसीसीआय संपूर्ण वेळापत्रक एकदाच जाहीर न करता परिस्थितीचा अंदाज घेऊन टप्प्याटप्प्याने घोषणा करणार आहे. यामुळे चाहत्यांना पूर्ण वेळापत्रकासाठी प्रतीक्षा करावी लागू शकते.

हेही वाचा – Shivam Dube: तोंडाला मास्क अन् डोक्यावर कॅप…, दुबेजींना करावा लागला लपूनछपून प्रवास; आश्चर्यचकित कारण समोर

12 मार्चला होणार पहिली घोषणा
आयपीएलचे अधिकृत वेळापत्रक 12 मार्च रोजी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीमुळे सुरुवातीला केवळ पहिल्या 3 आठवड्यांचेच वेळापत्रक समोर येईल, अशी माहिती मिळत आहे. त्यानंतर देशातील इंधन उपलब्धता आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील सामन्यांच्या तारखा निश्चित केल्या जातील. युद्धाच्या या झळा क्रिकेटला किती प्रमाणात बसणार आणि बीसीसीआय यातून काय मार्ग काढणार, याकडे आता जगभरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number