Shashi Tharoor: शशी थरूर यांचा वीर सावरकर पुरस्कार स्वीकारण्यास नकार; आयोजकांवर टीका करत म्हणाले, ‘मला कोणतीही…

काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी ‘वीर सावरकर इंटरनॅशनल इम्पॅक्ट अवॉर्ड’ स्वीकारण्यास नकार दिला.

Shashi Tharoor: शशी थरूर यांचा वीर सावरकर पुरस्कार स्वीकारण्यास नकार; आयोजकांवर टीका करत म्हणाले, ‘मला कोणतीही…

Shashi Tharoor: काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार आणि लेखक शशी थरूर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. एचआरडीएस इंडिया या स्वयंसेवी संस्थेने त्यांना ‘वीर सावरकर इंटरनॅशनल इम्पॅक्ट अवॉर्ड 2025’ जाहीर केला. मात्र, थरूर यांनी हा सन्मान स्पष्ट शब्दांत नाकारला आहे. पुरस्काराबद्दल माध्यमांमधून माहिती मिळाल्यानंतर त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि ही घोषणा ‘पूर्णपणे एकतर्फी’ असल्याचे सांगितले.

थरूर यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये त्यांनी स्पष्ट केले की, पुरस्काराबाबत सरकारकडून किंवा संस्थेकडून आधी कुठलीही चर्चा झालेली नाही. अशा परिस्थितीत स्वतःच्या संमतीशिवाय नाव जाहीर करणे ही बेजबाबदार कृती असल्याचे त्यांनी म्हटले. “जेव्हा मला कोणतीही माहिती दिली नाही, तेव्हा पुरस्कार स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही,” असे थरूर यांनी ठामपणे सांगितले.

कार्यक्रमाची तयारी मात्र सुरूच

या पुरस्कार वितरणाचा सोहळा 10 डिसेंबर रोजी नवी दिल्लीतील एनडीएमसी कॉन्व्हेन्शन सेंटरमध्ये नियोजित आहे. उद्घाटनासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले होते. तसेच उपराज्यपाल मनोज सिन्हा हे देखील प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार होते.

हेही वाचा: Raosaheb Danve: बोगस मतदानावरून राजकारण तापलं; रावसाहेब दानवेंचा शिंदे गटाच्या आमदारावर थेट प्रहार, म्हणाले…

संस्थेने जाहीर केलेल्या माहितीनुसार, या पुरस्कारासाठी सहा नावांची शिफारस करण्यात आली होती. त्यात अंतिम निवड शशी थरूर यांच्या नावावर झाली. पण, थरूर यांच्या या भूमिकेमुळे आता कार्यक्रमाचे स्वरूप बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राजकीय वर्तुळात चर्चा रंगली

थरूर हे विचार मांडताना स्पष्ट व निर्भीड भाषा वापरण्यासाठी ओळखले जातात. त्यामुळे या निर्णयाला राजकीय रंग चढण्याचीही शक्यता आहे. वीर सावरकर या नावाला भारतात राजकीय महत्त्व आहेच; त्यामुळे विरोधी पक्षातील नेत्याने हा पुरस्कार नाकारणे म्हणजे चर्चेची ठिणगी पेटण्याची चिन्हे राजकीय तज्ञ दाखवत आहेत.

काँग्रेस पक्षातदेखील यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काही कार्यकर्त्यांचे मत असे की, थरूर यांचा हा निर्णय पक्षाच्या विचाराशी सुसंगत आहे. तर काहींना वाटते की, थरूर सतत वेगळे मत मांडून पक्षात कोंडी निर्माण करतात.

हेही वाचा: ED Raids: बारामती पुन्हा ईडीच्या रडारवर; दुग्ध व्यवसायात शेकडो कोटींचा गैरव्यवहार

आयोजकांची भूमिका

आयोजक संस्थेने थरूर यांच्या वक्तव्यावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, “ज्यांना राष्ट्रासाठी केलेल्या कार्यामुळे जागतिक स्तरावर ओळख मिळाली आहे, त्यांना सन्मानित करण्यासाठी हा पुरस्कार देतो,” एवढेच त्यांचे म्हणणे आहे.

थरूर म्हणाले, 'संमतीशिवाय सन्मान स्वीकारता येणार नाही'

थरूर यांच्या भूमिकेत कटाक्षाने नैतिकतेचा मुद्दा दिसून येतो. त्यांच्यानुसार, कोणत्याही सन्मानासाठी पात्र ठरण्यापूर्वी निवड झालेल्या व्यक्तीला पूर्ण माहिती देणे आवश्यक आहे. अन्यथा, हा सन्मान फक्त औपचारिकतेपुरता राहतो. या संपूर्ण घडामोडीनंतर आता संस्थेचा पुढचा निर्णय काय असेल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number