पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रकृतीवरून महत्त्वाचं वक्तव्य समोर आलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रकृतीवरून मोठा दावा केला आहे. मोदींची प्रकृती सध्या बिघडली असून ते अस्वस्थ आणि थकलेले दिसत आहेत. त्यांच्या चालण्या बोलण्यातून ते जाणवतं आहे. थकलेल्या माणसाने देशाचं नेतृत्व करू नये. देशहितासाठी मोदी आणि शाह यांनी सत्तेतून दूर गेलं पाहिजे असे मतही राऊत यांनी व्यक्त केले.
मोदींची प्रकृती बरी नाही, ते आता थकलेत- संजय राऊत
राहुल गांधींशी इंडिया आघाडीविषयी चर्चा झाली. त्यांनी विरोधी पक्ष नेता म्हणून दबाव निर्माण केलाय, सरकारला कोंडीत पकडलंय. राहुल गांधींमुळे मोदींना कॅबिनेटचा चेहरा बदलावा लागतोय. पण, मुंडकं तेच आणि बाकी सर्जरी केली तर त्याला रिशफल म्हणत नाही. मोदी, शहांची प्रतिमा खराब झालीय. भाजपमध्ये एखाददुसरा नेता सोडला तर कैबिनेटमध्ये काम करु शकतील या लायकीचे नेते नाहीत. याचा परिणाम विकासावर होतोय. मोदींची प्रकृती बरी नाही, त्यांच्याकडून फार काम होत नाहीय. अमित शहांची प्रतिमा खराब झालीय त्यामुळे शहांना आधी बाजुला केले पाहिजे. राहुल गांधींचं नेतृत्व मोदींना मांगे टाकुन पुढे गेलंय. नेहरु शेवटच्या काळात फार थकले होते, तसे मोदी आता थकलेत. शरीर साथ देत नाहीय.
फडणविसांना केंद्रातली जबाबदारी घ्यावी लागेल- संजय राऊत
आता मोदी- शहांनी देशहीतासाठी बाजुला झाले पाहीजे. मोदींनी झोप न घेणं हे सुद्धा आजाराचं लक्षण आहे. अमित शहांना कधीही कुणीही पंतप्रधान करणार नाही. मोदी वगळता भाजपकडे चेह-याचा पर्यायच नाही. अरएसएस मधून देशाच्या नेतृत्वाबाबत चर्चा सुरु आहे. फडणविसांना केंद्रातली जबाबदारी घ्यावी लागेल. अमित शहांबरोबर कुणीही ज्येष्ठ मंडळी काम करायला तयार नाहीत, फडणविसही काम करायला तयार नाहीत, इतर नेत्यांनीही काम करायला नकार दिलाय.
इंडीया आघाडीचं भवितव्य चांगलं. जेन झी ला बळ मिळालं. राज्याराज्यात आम्ही आमच्या पद्धतीनं काम करत राहु. अमित शहांबरोबर काम करायला मोदीही तयार नाहीत. अमित शहांबरोबर काम करायला मोदीही तयार नाहीत. अमित शहा सध्या कुणाच्याही गुडबुक्समध्ये नाहीत. प्रताप सरनाईकांकडे डेलिगेशन वेळ मागतंय तरी वेळ दिला जात नाही. नाक्यांवरुन कलेक्शन देण्याकरता तुमच्याकडे वेळ आहे का? रिक्षाचालकांच्या डेलिगेशनला वेळ द्यावा लागेल. रॅपीडो अनेक मंत्री, नेत्यांच्या इव्हेंटस्चे प्रायोजक आहेत.