नवरी सजली, वऱ्हाड आलं अन् शेजाऱ्यांनीचं लग्न घरात..; नवरदेवाच्या भावासह 5 जणांसोबत घडलं विपरित

Shocking Incident : लग्नसमारंभ म्हटलं की आनंद, नाच-गाणं आणि सर्व घरात जल्लोषाचं वातावरण असतं. मात्र, उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये याच आनंदाला अचानक गालबोट लागलं गेलं आहे.
मुलीच्या घरी लग्नाचा जल्लोष अन् अचानक राडा
Shocking Wedding Incident in UP

लग्नसमारंभ म्हटलं की आनंद, नाच-गाणं आणि सर्व घरात जल्लोषाचं वातावरण असतं. मात्र, उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये याच आनंदाला अचानक गालबोट लागलं गेलं आहे. डीजेवर नाचणं, नोटा उधळणं आणि फटाक्यांची आतषबाजीवरुन झालेला वाद हा काही क्षणात इतका वाढला की, लग्नाच्या कार्यात आनंदाने सहभागी झालेल्या वऱ्हाड्यांवर ही खेट घराच्या छतावरुन दगड आणि विटांचा मारा करण्यात आला.

घरी वऱ्हाड आलं अन् शेजाऱ्यांनी घातला धुमाकूळ
ही संपूर्ण धक्कादायक घटना बुढाना परिसरातील हुसैनपूर कला या गावात शनिवारी रात्री घडली. गावातील सलीम इमामुद्दीन कुरेशी यांच्या मुलीचे लग्न होते. याच लग्नासाठी पलडी गावाकडून वऱ्हाड आलं होतं. डीजेच्या तालावर सर्वजण नाचत होते. वाहनांच्या छतावरुन नोटांच्या गड्ड्या उधळल्या जात होत्या, तर लग्नाचा उत्साह अधिक वाढवण्यासाठी फटाक्यांची आतषबाजीही सुरु होती.

हेही वाचा-वाहनाची वाट पाहत होती, गोड बोलून महिलेच्या जवळ आला अन् पुढे घडलं काळीज हादरवणारं

याच दरम्यान डीजेचा मोठा आवाजासह फटाक्यांच्या आतषबाजीवरुन परिसरात राहत असलेल्या काही नागरिकांनी आक्षेप घेतला. आवाज आणि फटाके बंद करण्यावरुनच वऱ्हाडी आणि शेजाऱ्यांमध्ये सुरुवातील शाब्दिक वाद सुरु झाला. मात्र, काही वेळानंतर हा क्षुल्लक वाद चिघळला आणि परिस्थिती ही नियंत्रणाबाहेर गेली, असा आरोप करण्यात येत आहे.

त्यानंतर काही जणांनी घराच्या छतावरुन वऱ्हाड्यांच्या दिशेने चक्क विटा आणि दगड फेकण्यास सुरुवात केली. अचानक सुरु झालेल्या या दगडफेकीमुळे लग्नसमारंभात मोठा गोंधळ उडाला. जीव वाचवण्यासाठी वऱ्हाड्या इकडे-तिकडे धावू लागले. धक्कादायक म्हणजे, या प्रकारात नवरदेवाचा धाकटा भाऊ यासह काही वऱ्हाडी जखमी झाले आहे.

समोर आली धक्कादायक माहिती
या घडलेल्या घटनेनंतर जखमी झालेल्या वऱ्हाड्यांनी एक अतिशय गंभीर आरोप केला आहे. हा वाद फक्त डीजे आणि फटाक्यांवरुन झाला नाही,तर नवरीच्या घरच्यांसोबत आधीपासून जुना वाद होता, असा दावा करण्यात आला आहे. त्यातूनच किरकोळ कारणावरुन झालेला वाद वाढत घेला.

हेही वाचा-आईसोबत मामाच्या गावी गेला अन् घरातल्यांसोबत तरुणाने…; 5 वर्षीय चिमुकलीलाही सोडलं नाही; अख्खं गाव हादरलं

घटनेची माहिती पोलिसांना मिळतात त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमींना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आलं आहे. या प्रकरणात जखमी झालेल्या व्यक्तींकडून तक्रार मिळतात संपूर्ण घटनेची चौकशी केली जाणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version