Sunday, July 13, 2025 10:54:35 AM

Shubhanshu Shukla: शुभांशू शुक्ला यांची अंतराळ झेप

शुभांशू शुक्ला यांनी अंतराळात झेप घेतली आहे. शुभांशू शुक्ला अंतराळात जाणारे दुसरे भारतीय आहेत. भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन आणि भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी आज अंतराळात झेप घेतली.

shubhanshu shukla शुभांशू शुक्ला यांची अंतराळ झेप

नवी दिल्ली: शुभांशू शुक्ला यांनी अंतराळात झेप घेतली आहे. शुभांशू शुक्ला अंतराळात जाणारे दुसरे भारतीय आहेत. भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन आणि भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी आज अंतराळात झेप घेतली. हा भारतासाठी एक ऐतिहासिक दिवस आहे. नासा अ‍ॅक्सिओम मिशन 4 यानअंतर्गत ही मोहिम त्यांनी साकारली आहे. अ‍ॅक्सिओम 4 मोहिमेचे प्रक्षेपण आज झाले. यासंदर्भात नासाने 24 जून, मंगळवारी घोषणा केलेली होती. अ‍ॅक्स-4 मिशन आज भारतीय वेळेनुसार दुपारी 12:01 वाजता फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी स्पेस सेंटर येथून प्रक्षेपित झाले. शुभांशू शुक्ला आज अंतराळात उड्डाण करताच, ते आयएसएसला भेट देणारे पहिले भारतीय आणि राकेश शर्मा यांच्या 1984 च्या मोहिमेनंतर अंतराळात जाणारे दुसरे भारतीय बनले आहेत.

हेही वाचा: महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याने भाजपा पदाधिकारी अटकेत, चित्रा वाघ यांचा संताप

भारतीय कॅप्टन शुभांशु शुक्ला कोण आहेत?

शुभांशु शुक्ला हे भारतीय वायूदलाचे कॅप्टन आहेत. ते राकेश शर्मा यांच्यानंतरचे दुसरे अंतराळवीर आहेत. 39 वर्षीय ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला उत्तर प्रदेशची राजधानी लखनौचे रहिवासी आहेत. 1985 साली शुभांशु शुक्ला यांचा जन्म झाला. 18 वर्षे त्यांनी भारतीय हवाई दलात कॅप्टन म्हणून काम केले. स्पेसएक्स ड्रॅगन स्पेसक्राफ्टवर मिशन पायलटच्या रुपात काम करणार आहेत. शुभांशु शुक्लांनी प्रतिष्ठित राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण घेतलं. शुभांशु शुक्ला यांना 2000 तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव आहे. शुभांशु शुक्ला यांना AN-32 सारखी लढाऊ विमाने उडवण्याचा अनुभव देखील आहे. शुभांशु शुक्ला ISS मोहिमेसाठी निवडले गेलेले सर्वात तरुण भारतीय अंतराळवीर आहेत. 


सम्बन्धित सामग्री