नवी दिल्ली: नवा सोपा आणि सुटसुटीत आयकर कायदा आणला जात असून, यासंबंधीचे विधेयक पुढील आठवड्यात संसदेत मांडले जाऊ शकते. वित्त सचिव तुहिनकांत पांडेय यांनी 'पीएच.डी. चेंबर ऑफ कॉमर्स'च्या एका कार्यक्रमात ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, 6 दशके जुन्या आयकर कायद्याची जागा नवे विधेयक घेईल. शुक्रवारी मंत्रीमंडळ बैठकीत यावर चर्चा होऊ शकते. वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात या विधेयकाचे सूतोवाच केले होते.
हेही वाचा: एकनाथ खडसेंची घरवापसी; भाजपात की शरद पवारांच्या पक्षात?
पांडेय यांनी सांगितले की, नवे आयकर विधेयक हे एकदम वेगळे विधेयक असेल. त्यात मोठमोठी वाक्ये नसतील. अटी-शर्ती आणि स्पष्टीकरणे नसतील. हा कायदा एकदम सोपा आणि सुलभ असेल. कायदे हे काही फक्त विधि व्यावसायिकांसाठी नसतात. ते सामान्य नागरिकांनाही समजायला हवेत. पांडेय यांनी म्हटले की, या विधेयकात कोणतेही नवे कर अथवा नवीन बोजा नाही. आम्ही धोरणातही कोणताच बदल केलेला नाही.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
आम्हाला कोणत्याही प्रकारची अस्थिर परिस्थिती निर्माण करायची नाही. आयकर कायदा 1961 ची जागा घेणारे हे विधेयक अवघ्या 6 महिन्यांत तयार करण्यात आले आहे. कायद्याच्या तरतुदी सामान्य करदात्यांना समजतील, अशीच त्याची भाषा ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्याचा आकारही छोटा कसा राहील, यासाठी प्रयत्न करण्यात आला आहे.