उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याला अनेक दुर्घटनांमुळे गालबोट लागले आहे. महाकुंभमेळ्यासाठी देशाच्या कानकोपऱ्यातून तसेच विदेशातूनही भाविक पवित्र स्नानासाठी येत आहेत. भाविकांची ही संख्या लाखोंच्या नाही तर करोडोंच्या घरात असल्याने प्रशासकीय यंत्रणेवर ताण निर्माण होणे स्वाभाविक आहे. मात्र, नियोजनातील काही त्रुटींमुळे भाविकांचा बळी जात आहे. शनिवारी रात्री दिल्ली रेल्वे स्थानकात प्रगायराजला जाणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी उसळली. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 18 भाविकांचा बळी गेला तर अनेक जण झखमी झालेत. अन्य एका दुर्घटनेत प्रयागराज येथील तंबूला आग लागल्याची घटना घडली.
हेही वाचा: मुंडेंच्या आईच्या नावाचा वापर करून आक्षेपार्ह टिप्पणी; गुन्हा दाखल
अलोट गर्दीने नियोजन ढासळले:
शनिवारी रात्री नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी झाली
चेंगराचेंगरीत 3 मुलांसह 18 जणांचा मृत्यू
नवी दिल्ली रेल्वे स्थानकातून कुंभमेळ्यासाठी 2 स्पेशल ट्रेन चालवल्या जात होत्या
वीकेंड असल्यानं शेकडो भाविक कुंभस्नानासाठी प्रयागराजला निघाले होते
स्वतंत्रता सेनानी एक्स्प्रेस आणि भुबनेश्वर एक्स्प्रेस ट्रेन उशीराने धावत होती
प्रवाशी प्लॅटफॉर्म नंबर 12-13 वर ट्रेनची वाट पाहत थांबले होते
महाकुंभला जाणारी एक ट्रेन प्लॅटफॉर्मवर आली
ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची एकच धावपळ सुरू झाली
यावेळी धावपळीत पायऱ्यांवर उभे असलेले लोक खाली पडले
ट्रेन पकडण्यासाठी प्रमाणाबाहेर गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी
गर्दी जास्त वाढल्यानं गुदरमरुन अनेक प्रवासी बेशुद्ध
एकमेकांवर प्रवाशी पडल्याने महिला आणि मुलांना सर्वाधिक त्रास
9 महिला, 4 मुलं आणि 5 पुरुष प्रवाशांचा मृतांमध्ये समावेश
आपल्या देशातील कुंभमेळा पाहून जगभरातील लोकं आश्चर्यचकीत झाल्याचं त्यांनी सांगितलंय. आत्तापर्यंत महाकुंभमध्ये 50 कोटी भाविकांनी गंगास्नान केलंय, असं सांगत दिल्लीतील घटना दुर्दैवी असू अशा घटना होऊ नये यासाठी प्रशासन काळजी घेईल, याची ग्वाही देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय. दिल्लीतील दुर्घटना असून त्यावर सगळ्यांनी दुःख व्यक्त केलंय. या पद्धतीच्या घटना होऊ नये, यासाठी प्रशासन निश्चित स्वरूपांत कारवाई करेल असंही फडणवीस म्हणालेत.
हेही वाचा: जितेंद्र आव्हाडांनी कोणाला दिल्या खास शुभेच्छा?
पद्मपुराणानुसार कुंभोत्सवाच्या दिव्य संगमाच्या वेळी प्रयागराजमध्ये स्नान करणाऱ्या भाविकांना जन्म-मृत्यूच्या बंधनातून मुक्ती मिळते, म्हणून या पवित्र ठिकाणी जाऊन स्नान,दर्शन आणि दान केल्याने भाविकांना पुण्य लाभLS अशी श्रद्धा असल्याने देशविदेशातील अनेक बाविकांनी प्रयागराज मध्ये प्रचंड गर्दी केली आहे. उत्तरप्रदेश सरकारने गर्दीचे नियोजन करूनही दररोजची गर्दी आटोक्यात आणणे प्रशासनाच्या आवाक्याबाबेर गेलं आहे. कुंभमेळ्याच्या निमित्ताने होणाऱ्या घटना दुर्देवी आहेत
याआधी घटलेल्या दुर्घटना :
1954 साली पहिल्याच कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत 800 भाविकांचा मृत्यू झाला होता
1986 मध्ये कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी 200 जणांचा मृत्यू
2003 साली नाशिकमधील चेंगराचेंगरीत महिलांसह 39 जणांचा मृत्यू
2013 साली पूल कोसळल्यानं झालेल्या चेंगराचेंगरी 45 जणांचा मृत्यू
या मोठ्या घटनांसह अनेक लहान घटनांमध्ये भाविकांचे मृत्यू झाले आहेत
महाकुंभात दर तासाला २ लाख लोकांनी स्नान करण्याची तयारी प्रशासनाने केली होती.मात्र, त्यापेक्षा अधिकपटीने भाविक पवित्र स्नानासाठी महाकुंभला हजेरी लावत आहेत. महाकुंभ मेळ्यात घडलेल्या दुर्घटनेमुळे जगाचे लक्ष या प्रयागराजवर केंद्रित झाले आहे.कुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांनी अधिकाधिक काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आलं असून दिलेल्या सूचनांचे पालन केलं तर दुर्घटना टाळता येतील असं आवाहनही उत्तरप्रदेश सरकारनं केलंय.