Gas Cylinder New Rules : LPG वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! गॅस सिलिंडरबाबत सरकारचा मोठा निर्णय; सिलिंडरचे वितरण होणार अधिक सोपं

गॅस सिलिंडरचा वापर करणाऱ्या नागरिकांना तसेच व्यावसायिकांना गॅस सिलिंडरचे वितरण अधिक सोपे व्हावे यासाठी सरकारने नवीन उपाय काढला आहे.

Gas Cylinder New Rules : LPG वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! गॅस सिलिंडरबाबत सरकारचा मोठा निर्णय; सिलिंडरचे वितरण होणार अधिक सोपं

इराण-अमेरिका युद्धामुळे गेल्या काही महिन्यात गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यावर चांगलाच परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. अशातच आता गॅस सिलिंडरचा वापर करणाऱ्या नागरिकांना तसेच व्यावसायिकांना गॅस सिलिंडरचे वितरण अधिक सोपे व्हावे यासाठी सरकारने नवीन उपाय काढला आहे.

सरकार सरकारी तेल कंपन्या इंडिनय ऑइल, भारत पेट्रोलिम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम आता 10 किलोग्रामच्या हलक्या कंपोझिट LPG सिलेंडरला घरगुती ग्राहकांसह कमर्शियल ग्राहकांसाठीही उपलब्ध करुन देण्याच्या तयारीत आहे. यामुळे छोटा-मोठा व्यवसाय करणाऱ्या सामान्यांच्या डोक्याचे टेन्शनच मिटू शकते. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली, तर विद्यार्थ्यांसाठी, नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आणि प्रवासी मजुरांसाठी मोठा फायदा होऊ शकतो. 

हेही वाचा- Medicine Education : आता संस्कृतच्या विद्यार्थ्यांना 10 वीनंतर थेट बनता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा 'आयुर्वेद गुरुकुलम' अभ्यासक्रम सुरू

सरकार सध्या घरगुती ग्राहकांसाठी उपलब्ध असणारे 10 किलोचे कंपोझिट सिलेंडर व्यावसायिकांसाठी देखील लॉन्च करण्याची शक्यता आहे. इंडियन ऑइल (IOC), भारत पेट्रोलियम (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) या शासकीय कंपन्या लवकच 10 किलो वजन असणारा गॅस सिलिंडर लॉन्च करण्याची शक्यता आहे.

HPCL याला HP Gas Ojas, IndianOil याला Indane Xtralight आणि BPCL याला Bharatgas Lite नावाने विकत आहे. आता तेल कंपन्या या टेक्नॉलॉजीला कमर्शियल ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा प्लॅन बनवत आहेत. रिपोर्टनुसार, यांना गॅस एजेंसी व्यतिरिक्त निवडक रिेटेल आउटलेट्सवरही कमर्शियल LPG च्या किंमतीत विकलं जाऊ शकतं. 

सध्या बाजारात 19 किलो, 5 किलो, 2 किलो अशा प्रकारात व्यावसायिक गॅस सिलिंडर अपलब्ध आहेत. त्यामध्ये अनेकांना 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडर वाहून नेण्यास अनेक अडचणी येतात. मिळालेल्या माहितीनुसार हा नवा सिलिंडर हाय डेनसिटी पॉलिएथिलीनपासून तयार करण्यात येईल. पारंपरिक गॅस सिलिंडरच्या तुलनेत हा नवा गॅस सिलिंडर 50 टक्क्यांनी हालका असेल. त्यामुळे सरकारच्या या निर्णयामुळे छोटे व्यावसायिक, स्ट्रिट फूड विक्रेते, विद्यार्थी, भाड्याने राहणारे लोक, प्रवासी मजूर यांच्यासाठी स्वयंपाकासाठी गॅस खरेदी करणे आणखी सोपे होणार आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number