दिवाळी-दसऱ्यापूर्वी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; साखरेची साठवणूक मर्यादा निश्चित, दरातही ‘इतक्या’ टक्क्यांची घट

आजपासून सुरू होणाऱ्या नवीन साखर हंगामाच्या पार्श्वभूमीवर, सरकारने साखर व्यापाऱ्यांसाठी साठा ठेवण्याच्या नियमांमध्ये कडक सुधारणा केल्या आहेत.

दिवाळी-दसऱ्यापूर्वी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; साखरेची साठवणूक मर्यादा निश्चित, दरातही ‘इतक्या’ टक्क्यांची घट
सणासुदीच्या काळात गोड बातमी! साखरेच्या दरात मोठी घसरण

Sugar Stock Limits: दसरा आणि दिवाळीसारख्या प्रमुख सणांच्या काळात साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि ग्राहकांना रास्त भावात साखर उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आजपासून सुरू होणाऱ्या नवीन साखर हंगामाच्या पार्श्वभूमीवर, सरकारने साखर व्यापाऱ्यांसाठी साठा ठेवण्याच्या नियमांमध्ये कडक सुधारणा केल्या आहेत. यानुसार व्यापाऱ्यांसाठी साठा ठेवण्याचा कालावधी 15 दिवसांपर्यंत मर्यादित करण्यात आला असून साठ्याची कमाल मर्यादा 1,000 क्विंटल निश्चित करण्यात आली आहे. हे नवीन निर्बंध 15 ऑक्टोबर 2026 ते 30 नोव्हेंबर 2026 या कालावधीत देशभर लागू राहणार आहेत.

कोलकाता आणि आसामसाठी वेगळे निकष

साखरेची कृत्रिम साठेबाजी रोखणे आणि सणासुदीच्या काळात बाजारात पुरवठा सुरळीत ठेवणे हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे. तथापि, स्थानिक बाजारातील विशिष्ट गरजा आणि पुरवठा साखळीचा विचार करून हे नियम कोलकाता आणि त्याच्या आसपासच्या महानगर क्षेत्रांना तसेच आसाम राज्याला लागू होणार नाहीत. कोलकाता आणि आसाम या भागांसाठी साठ्याची मर्यादा 2,000 क्विंटल निश्चित करण्यात आली आहे. कोलकाता येथे उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमधून साखरेचा मुख्य पुरवठा केला जातो, हे लक्षात घेऊन ही शिथिलता देण्यात आली आहे.

किरकोळ बाजारात साखरेचे दर घसरले

सरकारी निवेदनानुसार, ऑगस्ट महिन्यातील उच्चांकी पातळीच्या तुलनेत देशात साखरेचे सरासरी किरकोळ दर 15 टक्क्यांनी कमी झाले आहेत. येत्या काळात साखरेच्या किमतीत आणखी घट होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे, कारखान्यातील साखरेचे सुमारे 28 टक्क्यांनी घसरले असून गेल्या तीन आठवड्यांपासून ते एकाच पातळीवर स्थिर राहिले आहेत. कारखान्यातील दरात झालेली ही मोठी घट लक्षात घेता, त्याचा थेट लाभ अंतिम ग्राहकांपर्यंत त्वरित पोहोचवावा, असे स्पष्ट आवाहन सरकारने घाऊक व किरकोळ विक्रेत्यांना केले आहे.

हेही वाचा – सणासुदीत रेल्वे तिकिटाचं आरक्षण नाही? नो टेन्शन! पुणे विभागातून 216 स्पेशल ट्रेन ; कधी अन् कोणत्या मार्गावर धावणार?

साठेबाजी करणाऱ्यांवर सरकारची नजर

साखर कारखाने, व्यापारी, घाऊक विक्रेते आणि पुरवठा साखळीतील सर्व घटकांनी बाजारात साखरेचा अखंड पुरवठा सुरू ठेवावा आणि कोणत्याही प्रकारच्या सट्टेबाजी किंवा साठेबाजीपासून दूर राहावे, अशी अपेक्षा सरकारने व्यक्त केली आहे. सणासुदीच्या काळात साखरेची कोणतीही टंचाई भासू नये आणि भाव नियंत्रणात राहावेत यासाठी प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number